गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात मुसळधार पाऊस कोसळत आहे. याचा फटका अनेक नागरिकांना बसला असून अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरावर ढग फुटी झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे शहरात कोसळणारा पाऊस हा ढगफुटी तर नाही ना? असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत आहे. गेल्या कित्येक वर्षांमध्ये असा पाऊस झाला नव्हता, असे नागरिक सांगतात. मात्र, सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरत असून २४ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह ढगफुटी झाल्याच यातून सांगण्यात येत आहे. हा व्हिडिओ एका व्यक्तीने आपल्या ‘टिक टॉक’ अकाऊंटवर अपलोड केला आहे. व्हिडीओ मध्यरात्री दोनच्या सुमारास काढण्यात आल्याचं सांगत त्यात ढगफुटी झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. अवघ्या दहा सेकंदाच्या व्हिडिओमध्ये वरून राजाचे आणि विजांचा लखलखाट चे रौद्र रूप दिसत आहे.
सध्या हा व्हिडीओ हजारो जणांनी लाईक तर शेकडो जणांनी शेअरदेखील केला आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात पावसाने हाहाकार माजवला असून अनेकांच्या घरात पाणी शिरले होते. यामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाल्याचंही पहायला मिळालं. शहरावर खरच तर ढग फुटी झाली नाही ना? असा प्रश्न या निमित्ताने अनेकांना पडला आहे.