राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळेचे (एनसीएल) संचालक डॉ. सौरभ पाल यांना ‘सस्त्रा युनिव्हर्सिटी’कडून सीएनआर राव पुरस्कार मिळाला आहे, तर डॉ. सी. व्ही. रमणा यांना बंगळुरू येथील इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सची अभ्यासवृत्ती जाहीर झाली आहे.
रसायनशास्त्रामध्ये उत्तम कामगिरी करण्याऱ्या व्यक्तीला तंजावर येथील ‘सस्त्रा युनिव्हर्सिटी’कडून ‘सस्त्रा सीएनआर राव’ पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी हा पुरस्कार एनसीएलचे संचालक डॉ. सौरभ पाल यांना देण्यात येणार आहे. डॉ. पाल हे २०१० पासून एनसीएलचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. एनसीएलमध्येच वरिष्ठ संशोधक म्हणून कार्यरत असणारे डॉ. सी. व्ही. रमणा यांना बंगळुरू येथील इंडियन अॅकॅडमी ऑफ सायन्सतर्फे अभ्यासवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. डॉ. रमणा हे सेंद्रिय रसायनशास्त्रातील संशोधक आहेत.