मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इन्डस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर या संस्थेतर्फे ‘बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या निर्मितीमध्ये स्मार्ट टेक्नॉलॉजीचा वापर’ या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इन्डस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरचे अध्यक्ष एस. के. जैन यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इन्डस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरच्या पायाभूत सुविधा आणि बांधकाम विभागाकडून या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. १० आणि ११ ऑक्टोबरला ही परिषद होणार असून एचसीसीचे व्यवस्थापकीय संचालक अजित गुलाबचंद यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे. बांधकाम निर्मितीच्या क्षेत्रामध्ये होणारे बदल, नव्या तंत्रज्ञानाचा वापर अशा विषयांवर या परिषदेमध्ये चर्चासत्रे होणार आहेत. बांधकाम आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील तज्ज्ञ या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.
या वेळी जैन म्हणाले, ‘‘बदलत्या काळानुसार प्रत्येक क्षेत्रामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची, सतत अद्ययावत राहण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे उत्पदनाची किंमत आणि त्याच्या निर्मितीसाठी लागणारा वेळ कमी होऊ शकतो.