रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये मंदिरे, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय आणि…

पिंपरी- चिंचवड: आयटी हब हिंजवडीच्या विकासकामांवरून ग्रामस्थ विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार असा संघर्ष सुरू झाला आहे. गेल्या महिनाभरात अजित पवार यांनी हिंजवडीचा दोन वेळेस पाहणी दौरा केला आहे. अनेक ठिकाणी बदल करण्याच्या सूचना अजित पवारांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यावर ग्रामस्थ मात्र नाराज आहेत.

अजित पवार हिंजवडी ग्रामस्थांना विश्वासात घेत नाहीत. असा आरोप सरपंच गणेश जांभुळकर यांनी केला आहे. अजित पवारांनी योग्य मार्ग न काढल्यास आगामी काळात न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं आजच्या ग्रामसभेत ठराव झाला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डांगे चौक आणि वाकडच्या दिशेने जाणारा रस्ता अरुंद आहे. त्याच रुंदीकरण करण्यात येणार असल्याने हिंजवडी गावठाणचा काही भाग रुंदीकरणात जाणार आहे. यावरून हिंजवडी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. सध्या हा रस्ता ३० मीटर ऐवजी २४ मीटर चा करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या रस्त्या दरम्यान मंदिरे, शाळा, दशविधी घाट, ग्रामपंचायतच कार्यालय, स्मशानभूमी आहे. ५०- ५० वर्षांपूर्वीची घरे आहेत. यामुळे रस्ता रुंदीकरण करताना तो कमी करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थ यांनी केली आहे. याबाबत लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सांगणार असल्याचं सरपंच गणेश जांभुळकर यांनी सांगितलं आहे.

अजित पवारांनी ग्रामस्थांच न ऐकल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. वेळ पडल्यास हिंजवडीत नेते आल्यास आमच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही आंदोलन करून रस्त्यावर उतरू असा इशारा देण्यात आला आहे. हे सर्व पाहता उपमुख्यमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात हे बघावं लागेल.