scorecardresearch

पुणे: पत्र्याच्या शेडमध्ये लागोपाठ २० सिलेंडर्सचे स्फोट; परिसरात खळबळ

या शेडमध्ये सिलेंडरचा बेकायदेशीरपणे साठा करून ठेवला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुणे : कात्रज भागातील गंधर्व लॉनजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे मंगळवारी सायंकाळी स्फोट ‌झाले. एकापाठोपाठ दहा सिलींडरचे स्फोट झाल्याने परिसरात घबराट उडाली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.


या आगीत एक व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अग्निशमन दलाची सहा वाहने घटनास्थळी दाखल झाली असून त्यांनी आग आटोक्यात आणली आहे . कात्रज भागातील गंधर्व लॉनजवळ एका पत्र्याच्या शेडमध्ये सिलेंडरचा साठा करून ठेवण्यात आला होता.

पत्र्याच्या शेडमध्ये सिलेंडरचा बेकायदेशीर साठा कऱण्यात आला असल्याची शक्यता अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Continuous 10 cylinder blasts in katraj pune fire brigade on the spot pune print news vsk

ताज्या बातम्या