वाणी आणि वर्तन यांच्यामध्ये समन्वय असावा, असा संदेश भागवतातून आपल्याला मिळतो. ज्या आदर्श जीवनाची अपेक्षा आपण करत आहोत त्यासाठी आपल्या वाणी आणि वर्तनात योग्य तो समतोल ठेवून समाजजीवनात योग्य संदेश जाईल असा प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा, असे मत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी व्यक्त केले.
निनाद, पुणे आणि निनाद नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजित श्रीमद् भागवत अद्वैतानंद सप्ताह सोहळ्यात निनाद योगेश्वरी पुरस्कार स्थितप्रज्ञानंद सरस्वती, फुलगाव यांना प्रदान करण्यात आला, या वेळी गोगावले बोलत होते. सुनील कुरणे, माजी नगरसेवक उदय जोशी, शुभदा जोशी, संजय देशपांडे, सुनीता देशपांडे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. सन्मानपत्र, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उदय जोशी यांनी तर सूत्रसंचालन अनुप जोशी यांनी केले.गोगावले म्हणाले,की या देशातील सर्वसामान्य नागरिक ज्या सुख आणि समाधानाची अपेक्षा करतो, त्या प्रकारची सामाजिक आणि राजकीय अवस्था निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठी सामान्य जनतेचा विचार करुन विविध योजनादेखील सुरू करण्यात आल्या आहेत.
आदर्श राज्यकर्ता कसा असावा, याचा वस्तुपाठ आम्ही घालू इच्छितो. यामागे देखील भागवतातील शिकवणीप्रमाणे आध्यात्मिक बठक आहे.सप्ताहाचा समारोप पंढरपूर आळंदी देवस्थानचे हभप केशवमहाराज उखळीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाला. तसेच विनायकबुवा जोशी यांच्यासह एक्कावन्न जणांनी रहाळकर राम मंदिर येथे संस्कृतमध्ये रोज संहिता वाचन केले. कलातीर्थ, पुणेच्या अमोल काळे, अश्विनी कुलकर्णी, मोहिनी कुलकर्णी यांनी प्रसंग सादरीकरणाचे आयोजन केले. तर बाबा शिंदे, रामिलग शिवणगे, मयुरेश जोशी, अशोक कुलकर्णी आदींनी सप्ताहाच्या संयोजनात सहभाग घेतला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coordination required between voice and behavior says yogesh gogavale
First published on: 25-05-2016 at 04:00 IST