महानगर पालिका प्रशासनाकडून मोफत गोवऱ्या आणि लाकडं दिली जातात

पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी साडेआठ हजार रुपये घेत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ समोर आला असून काही पालिका कर्मचारी खासगी व्यक्तींना हाताशी धरून पैसे खात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. एकीकडे पालिका प्रशासनाने अंत्यसंस्कारासाठी लागणाऱ्या गोऱ्या आणि लाकडं हे मोफत महानगर पालिकेकडून दिलं जात आहे. मात्र, दुसरीकडे असा मानवी कृत्याला काळिमा फासणारी घटना घडलीय.

करोना विषाणूने पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या हद्दीत अक्षरशः थैमान घातले असून मृत्यू चा आकडा वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. असे असताना पिंपरी च्या भाटनगर येथील स्मशानभूमीत करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार केले जातात. भाटनगर येथे करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंतसंस्कार करण्यासाठी साडेआठ हजार रुपये घेतले असल्याचं व्हिडिओद्वारे समोर आले आहे. यात, वखारीवाला आणि इतर एक खासगी व्यक्ती पैसे घेतो अस सांगितलं गेलं आहे. समोर चा व्यक्ती महानगर पालिका मोफत देते अस विचारत असताना समोरील व्यक्ती महानगर पालिका देत नाही अस म्हणताना पाहायला मिळत. दरम्यान, महानगर पालिकेकडून आजच (रविवारी) मृतदेहाला गोऱ्या आणि लाकडं मोफत आहेत अस पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. कोणी पैसे मागितले तर मोबाईल क्रमांक दिला असून त्यावर संपर्क साधण्यास सांगितलं आहे. त्यानंतर ही अशी गंभीर घटना उघडकीस आली आहे. यावर महानगर पालिका आयुक्त राजेश पाटील काय कारवाई करणार हे पाहाव लागणार आहे.