पुणे शहरात आज दिवसभरात २८८ नवे करोनाबाधित आढळले असून, १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर करोनाबाधितांची एकूण संख्या आता १ लाख ६० हजार ३७४ वर पोहचली आहे. आतापर्यंत ४ हजार १८० रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. करोनावर उपचार घेणार्‍या ४४१ रुग्णांची तब्येत ठीक असल्याने, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत १ लाख ५० हजार ३६० रुग्ण करोनामुक्त झाले असल्याची माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागा मार्फत देण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात २१६ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले असून, चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर, ४३६ जण करोनामुक्त झाले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरातील करोनाबाधितांची एकूण संख्या ८७ हजार २६० असून, यापैकी ८३ हजार ८१० जण करोनातून बरे झाले आहेत. पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार घेत असलेल्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ८८८ एवढी आहे, अशी माहिती महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus 17 deaths 288 new cases in pune in a day msr 87 svk 88 kjp
First published on: 28-10-2020 at 19:47 IST