कोथरूड येथील पौड फाटा परिसरातील सार्वजनिक स्वच्छतागृहाचा वापर करता येऊ नये, त्या भागातील नागरिकांनी घर सोडून इतर ठिकाणी राहण्यास जावे यासाठी त्रास देऊन महिलांच्या स्वच्छतागृहाचे दरवाजे काढल्याप्रकरणी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह चौघांविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोथरूड पोलिसांना न्यायालयाने दिले आहेत.

महापौर मुरलीधर मोहोळ (रा. मयूर कॉलनी, कोथरूड), ठेकेदार वसंत चव्हाण (रा. भुसारी कॉलनी, कोथरूड) आणि ठेकेदार राहुल शिवाजी शिंदे (रा. भुसारी कॉलनी, कोथरूड) आणि एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने कोथरूड पोलिसांना दिले आहेत.

Ram Navami, High Court, State Govt,
रामनवमीला खबरदारी घ्या! उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश
Balaji temple plot, CIDCO,
बालाजी मंदिर भूखंडाविरोधात याचिका, २५ एप्रिलला सुनावणी; सिडकोचा हरकतीचा मुद्दा फेटाळल्याचा दावा
osho marathi news, osho aashram pune marathi news
ओशो इंटरनॅशनल फाऊंडेशनला उच्च न्यायालयाचा तडाखा, पुण्यातील मोक्याच्या ठिकाणची आश्रमाची जमीन विकण्याची मागणी फेटाळली
2008 Malegaon bomb blast case
२००८ मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर खरेच आजारी आहेत का ? प्रकृतीची शहानिशा करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश

या प्रकरणी देविदास भानुदास ओव्हाळ हे तक्रारदार आहेत. ते पौड फाटा येथील शीलाविहार कॉलनीमध्ये रहिवासी आहेत. तर महापौर मुरलीधर मोहोळ त्या भागातील नगरसेवक असून त्यांच्यासह इतर तिघांनी कटकारस्थान रचून तक्रारदार राहत असलेल्या भागातील सार्वजनिक स्वच्छतागृह वापरता येऊ नये, नागरिकांनी घर सोडून दुसरीकडे राहण्यास जावे म्हणून महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काही व्यक्तींच्या मदतीने २० ऑक्टोबर रोजी स्वच्छतागृहाचे दरवाजे काढून टाकले, असा आरोप तक्रादाराने केला आहे.

तक्रारदार आणि स्थानिक नागरिक मागासवर्गीय असल्याचे माहीत असताना देखील आकस बुद्धीने कट रचून नैसर्गिक गरजा भागवण्यासाठी तयार केलेल्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचे दरवाजे काढले. झोपडपट्टी परिसरात राहणार्‍या स्त्रियांच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले, असे त्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या तक्रारी अर्जात म्हटले आहे. त्यानुसार न्यायालयाने मुरलीधर मोहोळ यांच्यासह चौघांविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश कोथरूड पोलिसांना न्यायालयाने दिले आहेत.