उपमहापौर उल्हास ऊर्फ आबा बागूल यांचा मुलगा अमित याच्या विरुद्ध एका महिलेने बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे. या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात शनिवारी एकच खळबळ उडाली. दरम्यान, तक्रारदार महिलेने १५ डिसेंबर रोजीच तक्रार मागे घेत असल्याचा अर्ज दत्तवाडी पोलिसांकडे दिला होता. यापूर्वी तिच्याविरुद्ध सात अदखलपात्र गुन्हय़ांचीही नोंद झाली होती. एकतर्फी प्रेमातून तिने खोटी तक्रार दिली असून, या महिलेने केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचे उपमहापौर बागूल यांनी स्पष्ट केले आहे.
याप्रकरणी अमित उल्हास बागूल याच्यासह कपिल बागूल, भागवत, रावळ आणि त्यांच्या एका साथीदाराविरुद्ध पोलिसांनी बलात्कार, विनयभंग, धमकावणे या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात या विवाहितेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार विवाहिता ही परिचारिका आहे. आबा बागूल यांच्या वतीने दरवर्षी काशी यात्रेचे आयोजन करण्यात येते. बागूल यांनी २०११ मध्ये आयोजित केलेल्या काशी यात्रेत वैद्यकीय पथकासोबत तक्रारदार विवाहिता परिचारिका म्हणून सहभागी झाली होती. या वेळी अमित याने धमकावून बलात्कार केला, अशी या महिलेची तक्रार आहे. या प्रकाराची मी पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे काही दिवसांपूर्वी कपिल याने मला सदनिका देण्याचे आमिष दाखविले, असाही आरोप तिने फिर्यादीत केला आहे.
दरम्यान, विवाहितेने केलेले सर्व आरोप उपमहापौर आबा बागूल यांनी फेटाळले आहेत. मुलगा अमित आणि कपिल यांच्याविरुद्ध केलेल्या आरोपात तथ्य नाही. या महिलेने २४ डिसेंबर रोजी पोलिसांकडे प्रतिज्ञापत्रही सादर केले होते. त्यात अमित बागूल याच्याविरुद्ध माझी कोणतीही तक्रार नाही. माझे अमित बागूल यांच्यावर एकतर्फी प्रेम आहे, असे या महिलेने प्रतिज्ञापत्रात नमूद केले होते. या महिलेकडून यापूर्वी अश्लील मेसेजही पाठविण्यात आले होते. तिच्याविरुद्ध आम्ही पोलीस आयुक्तांकडे तक्रारही केली होती. यापूर्वी या महिलेविरुद्ध सात अदखलपात्र गुन्हे दाखल झाले आहेत, असे आबा बागूल यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 27th Dec 2015 रोजी प्रकाशित
उपमहापौर आबा बागूल यांच्या मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा
उपमहापौर उल्हास ऊर्फ आबा बागूल यांचा मुलगा अमित याच्या विरुद्ध एका महिलेने बलात्काराची फिर्याद दाखल केली आहे. या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात शनिवारी एकच खळबळ उडाली.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 27-12-2015 at 03:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime on deputy mayor aba bagul son in rape case