देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडासह साथीदाराला वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली. ओकेभाई उर्फ ओंकार चंद्रशेखर कापरे (वय २७, रा. संत गाडगेबाबा शाळेसमोर, लक्ष्मी निवास, कोंढवा खुर्द), मनीष उर्फ आकाश मारुती झांबरे (वय २७, रा. झांबरे तालीम संघ, होळकरवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

हेही वाचा- पुणे: मारहाण प्रकरणात मिलिंद एकबोटे यांच्यासह आठ जणांची निर्दोष मुक्तता

ओकेभाई कापरे सराईत गुंड असून त्याच्या विरोधात गुन्हे दाखल आहेत. तो हडपसर-काळेपडळ भागातील जेएसपीएम महाविद्यालयाजवळ थांबल्याची माहिती वानवडी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून कापरे आणि साथीदार झांबरे यांना पकडले.

हेही वाचा- पुणे: बालिकेचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी दोघांना जन्मठेप

कापरेची झडती घेण्यात आली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल आणि पाच काडतुसे सापडली. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त पौर्णिमा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड, गु्न्हे शाखेचे निरीक्षक संदीप शिवले, सहायक निरीक्षक जयवंत जाधव, उपनिरीक्षक अजय भोसले, संतोष तानवडे, अमजद पठाण, संतोष काळे, अतुल गायकवाड, विनोद भंडलकर आदींनी ही कारवाई केली.