पुणे : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि इटालियन शक्तिसमोर लोटांगण घातले आहे. त्यामुळे त्यांना मत म्हणजे सनातन हिंदू धर्म संपविण्याची वल्गना करणाऱ्यांना मत असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे रविवारी केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘हर मंदिर स्वच्छता’ या देशव्यापी अभियानाचा राज्यातील शुभारंभ शिवाजीनगर गावठाणातील रोकडोबा मंदिर परिसरात करण्यात आला. त्यानंतर  बावनकुळे पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील प्रत्येक मंदिरात हे अभियान राबविण्याचा संकल्प त्यांनी या वेळी बोलून दाखवला. आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, प्रदेश उपाध्यक्ष आणि राममंदिर अभियानाचे राज्याचे संयोजक राजेश पांडे, सुनील देवधर यावेळी उपस्थित होते.

काँग्रेसने नेहमीच देशातील हिंदू समाजाचा अपमान केला आहे. अयोध्येतील श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यावर त्यांनी बहिष्कार टाकला आहे. सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडताना काँग्रेसने रामाचा जन्म काल्पनिक असल्याचे प्रतिज्ञापत्र दिले आहे. एनडीए सत्तेत आल्यास हिंदुस्थानातील सनातन धर्म संपवण्याची भाषा उदयनिधी स्टॅलिन यांनी केली आहे. या इंडिया आघाडीचे उद्धव ठाकरे घटक आहेत. याचाच अर्थ उद्धव ठाकरेंना मत म्हणजेच हिंदू सनातन धर्म संपवण्याची वल्गना करणाऱ्यांना मत असा होतो. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि इटालियन शक्तिसमोर लोटांगण घातले आहे, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.

lok sabha elections 2024 rahul gandhi attacks bjp over dynasty politics
मंत्रिमंडळ नव्हे ‘परिवार मंडळ’; मंत्र्यांच्या घराणेशाहीवर बोट, राहुल गांधी यांची टीका
lok sabha election results 2024 bjp leaders hold meeting on eve of lok sabha poll counting
मतमोजणीच्या पूर्वसंध्येला भाजप नेत्यांची बैठक
After Sanjay Raut allegation interest in Nagpur Lok Sabha election results
संजय राऊत यांच्या आरोपानंतर नागपूरच्या निकालाची उत्सुकता
AAP MP Swati Maliwal and YouTuber Dhruv Rathee
ध्रुव राठी आणि ‘आप’वर स्वाती मालिवाल यांचा मोठा आरोप; म्हणाल्या, “बलात्कार आणि जीवे मारण्याची..”
BJP, BJP s path tough in Haryana, displeasure of farmers , six phase of lok sabha 2024, BJP s path tough in Punjab, displeasure of farmers against bjp, marathi news lok sabha 2024,
हरयाणा, पंजाबमध्ये बहुरंगी लढतींमुळे भाजपचा मार्ग खडतर? सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या नाराजीची चिंता?
devendra fadnavis replied to sharad pawar
“शरद पवार सध्या नकारात्मक मानसिकतेत, त्यांच्यासारख्या मोठ्या व्यक्तीला..”; दुष्काळावरील टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर!
pm Narendra modi parmatma ka dut marathi news
प्रधानसेवक, चौकीदार आणि आता परमात्मा का दूत…
kolhapur district bank board of directors pay tribute to pn patil from Italy
इटलीमध्ये आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली

हेही वाचा >>>डेंग्यू, हिवतापावर अद्ययावत उपचार कसे करावेत? डॉक्टरांनी गिरवले धडे…

 महायुतीचे मेळावे सुरू झाले आहेत. येत्या काळात बूथ आणि विभागीय स्तरावर या मेळाव्यांचे आयोजन केले जाणार आहे. महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या घटक पक्षांमध्ये विरोधी पक्षातील नेते प्रवेश करण्यास उत्सुक आहेत. आगामी काळात राज्याला मोठे राजकीय हादरे बसतील. मोदींच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारत घडविण्यासाठी आणि आमचा विचार स्वीकारणाऱ्यांसाठी भाजपचे दरवाजे खुले आहेत, असेही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.