पिंपरी: निवडणूक आयोगाच्या वतीने मतदार पुर्नीक्षण मोहीम राबविण्यात येत असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने विविध प्रकारे मतदार जनजागृती करण्यात येत आहे. पुणे सायक्लोथॉन मोहिमेतही पालिकेने जनजागृती करण्याची संधी साधली.

पुणे सायक्लोथॉन मोहीम पिंपरी-चिंचवड शहरातही राबविण्यात आली होती. महापौर माई ढोरे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन झाले. प्रसिद्ध अभिनेते सुनील शेट्टी, आयुक्त राजेश पाटील, पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आदी यावेळी उपस्थित होते. या सायकल फेरीत तीन हजाराहून अधिक सायकलपटू सहभागी झाले होते. त्यात महाविद्यालयीन युवक-युवतींचा सहभाग मोठय़ा प्रमाणात होता. त्याचे औचित्य साधून पालिकेच्या निवडणूक विभागाच्या वतीने मतदार जनजागृती करण्यात आली. १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान मतदार नोंदणी व पुर्नीक्षण मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.