मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विद्युत रोषणाईचे उद्घाटन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टतर्फे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांनिमित्त श्री ब्रह्मणस्पती मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. गणेश चतुर्थीला शुक्रवारी (२५ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते देखाव्याच्या विद्युत रोषणाईचे उद्घाटन करण्यात येणार आहे. ऋग्वेद आणि मुद्गल पुराणामध्ये गणेशाचा ‘ब्रह्मणस्पती’ म्हणून प्रथम उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे देवांचे अधिपती असलेल्या गणरायाला विराजमान होण्याकरिता नागर, द्राविड आणि वेसर शैलीतील मंदिरांप्रमाणे गाणपत्य शैलीचे आगळेवेगळे मंदिर साकारण्यात आले आहे. १११ फूट लांब, ९० फूट रुंद आणि ९० फूट उंचीच्या या देखाव्यामध्ये गोलाकार घुमटाखाली ३६ फुटी गाभारा आहे. डेक्कन कॉलेजचे डॉ.श्रीकांत प्रधान आणि स्वानंद पुंड महाराज यांनी याविषयी माहिती दिली आहे. त्याआधारे त्रिशूल, अंकुश, शंख, कमळ अशी गणेशाची आयुधे मंदिरावर लावण्यात आली आहेत. हत्ती, मोर, गाय या प्राण्यांच्या शिल्पांनी मंदिरातील खांब सजविण्यात आले आहेत. सभामंडपाच्या छतावरील काचेच्या झुंबरांवर रेखाटण्यात आलेली ब्रह्मणस्पती आणि गणेश यंत्र हे खास आकर्षण असणार आहे. सव्वा लाख मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघणार आहे. अत्याधुनिक प्रकाशयोजनेमध्ये मंदिर उजळून निघणार आहे. शिल्पकार विवेक खटावकर यांनी हे मंदिर घडविले आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी सोमवारी दिली. ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि विश्वस्त नगरसेवक हेमंत रासने या वेळी उपस्थित होते.

Vasai, Death sanitation workers,
वसई : सफाई कर्मचार्‍यांचा मृत्यू; राष्ट्रीय सफाई आयोगाकडून कारवाईचे निर्देश, मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ३० लाखांची मदत
mahayuti, Nasrapur, Traffic,
नसरापूर येथे महायुतीची सभा; पुणे सातारा रस्त्यावर वाहतूक विस्कळित
mira road, Seize 1 thousand 500 kg of Beef, seize beef in mira road, mira road beef, cow guards, gau rakshak, police, beef news, mira road news, marathi news,
मिरा रोड येथे दीड हजार किलो गोमांस जप्त
houses, MHADA, Goregaon, houses Goregaon,
पंचतारांकित इमारतीमधील घरांसाठी ऑगस्टमध्ये सोडत, गोरेगावमध्ये मध्यम आणि उच्च गटासाठी म्हाडाची ३३२ घरे

ट्रस्टतर्फे दरवर्षीप्रमाणे गणेशभक्तांसाठी ५० कोटी रुपयांचा विमा उतरविण्यात आला आहे. दुर्दैवाने काही दुर्घटना झाल्यास भाविकांना विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. फरासखाना चौक, बाबू गेनू चौक, दत्तमंदिर, बेलबाग चौक परिसरात देखील सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. याशिवाय मंदिर परिसरात कायमस्वरुपी असलेल्या कॅमेऱ्यांसह तब्बल १५० कॅमेरे असतील. पोलीस यंत्रणेसोबत ट्रस्टची २५० जणांचा समावेश असलेली खासगी सुरक्षाव्यवस्था या परिसरावर लक्ष ठेवणार आहे.

४० किलो सोन्याचे अलंकार

शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त भाविकांनी श्रींच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्यातून नावीन्यपूर्ण अलंकार घडविण्यात आले आहेत. आकर्षक नक्षीकाम, हत्ती शिल्प, मोरतुरे आणि नवग्रहांच्या समावेशासह १० हजार खडय़ांची सजावट असलेला साडेनऊ किलो वजनाचा मुकुट, रत्नजडित  ७०० ग्रॅम वजनाचा शुंडहार, सूर्यकिरणांचा आभास निर्माण करणारे दोन किलो वजनाचे सोन्याचे कान, चार हजार सुवर्णटिकल्यांनी मीणाकाम करुन चंद्रकोरीचा आभास निर्मिती करणारा अडीच किलो वजनाचा अंगरखा, हे अलंकार गणेश चतुर्थीला अर्पण करण्यात येणार आहेत. याशिवाय खडेकाम असलेले साडेतीन किलो वजनाचे उपरणे, साडेसहा किलो वजनाचे सोवळे, पांढऱ्या खडयांचे कोंदण असलेला एक किलो वजनाचा हार असे दागिने साकारले आहेत. पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे ४० कारागीर गेल्या पाच महिन्यांपासून या कामात कार्यरत आहेत. सुवर्णालंकार घडविण्यासाठी आलेला सव्वा कोटी रुपये मजुरीचा खर्च न घेता गाडगीळ यांनी गणरायाच्या चरणी सेवा अर्पण केली आहे.