शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी कार्यरत असलेल्या ‘बनियान ट्री इव्हेंट्स’ संस्थेतर्फे येत्या शनिवारी (१५ मार्च) कर्नाटक शैलीतील संगीताची मेजवानी देणाऱ्या ‘दक्षिणायन’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये चेन्नई येथील कलार्पण भरतनाटय़म स्कूलच्या संचालक, प्रसिद्ध अभिनेत्री शोभना यांचा भरतनाटय़म नृत्याविष्कार आणि टी. एम. कृष्णा यांच्या कर्नाटक शास्त्रीय संगीताची मैफल होणार आहे. यशवंतराव चव्हाण नाटय़गृह येथे सायंकाळी पावणेसात वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका न्यू रिदम हाऊस (दूरध्वनी क्र. २५५२१३३५), लँडमार्क, एसजीएस मॉल (दूरध्वनी क्र. ४००६८८८८) येथे उपलब्ध होणार असल्याची माहिती संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक महेश बाबू यांनी दिली.
संग्रहित लेख, दिनांक 12th Mar 2013 रोजी प्रकाशित
‘बनियान ट्री इव्हेंट्स’तर्फे शनिवारी ‘दक्षिणायन’ या मैफलीचे आयोजन
शास्त्रीय संगीताच्या प्रचारासाठी कार्यरत असलेल्या ‘बनियान ट्री इव्हेंट्स’ संस्थेतर्फे येत्या शनिवारी (१५ मार्च) कर्नाटक शैलीतील संगीताची मेजवानी देणाऱ्या ‘दक्षिणायन’ या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

First published on: 12-03-2013 at 01:48 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dakshinayan concert on saturday by baniyan tree events