scorecardresearch

उच्च शिक्षण शिष्यवृत्ती योजनेच्या अर्जासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत

उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबवल्या जाणाऱ्या १४ शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी दिली.

(प्रातिनिधिक छायाचित्र)

पुणे : उच्च शिक्षण संचालनालयामार्फत राबवल्या जाणाऱ्या १४ शिष्यवृत्ती योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदत देण्यात आल्याची माहिती पुणे विभागाचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर यांनी दिली.

महाडीबीटी पोर्टलद्वारे शिष्यवृत्ती योजनांची ऑनलाईन अंमलबजावणी करण्यात येते. त्यात राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना, एकलव्य आर्थिक सहाय्य, दक्षिणा अधिछात्रवृत्ती, शासकीय संशोधन अधिछात्रवृत्ती, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ शिष्यवृत्ती, खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती, गणित आणि भौतिकशास्त्र विषयातील प्रज्ञावान विद्यार्थी शिष्यवृत्ती, शासकीय विद्यानिकेतन शिष्यवृत्ती, अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (भाग २), माजी सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य, स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांना आर्थिक सहाय्य या योजनांचा समावेश आहे. अधिक माहिती  https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Deadline application higher education scholarship scheme ysh

ताज्या बातम्या