पुणे : महाराष्ट्र महिला हॉकी संघटनेचे माजी सचिव आणि विविध दुर्मीळ वस्तूंचा छंद जोपासणारे संग्राहक श्रीनिवास भट यांचे (वय ८३) हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. १९६३ मध्ये ते पुण्यात आले. खासगी कंपनीत नोकरी केल्यानंतर त्यांनी ‘कुम इंडस्ट्री’ ही केमिकल कंपनी सुरू केली. महाराष्ट्र महिला हॉकी संघटनेचे सचिव म्हणून १८ वर्षे जबाबदारी सांभाळली. नाण्यांच्या संग्रहासाठी भट यांच्या नावाची २००४ ला लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. त्यांच्या संग्रहात पाच हजार नाणी, बाराशे लेपल पिन आणि गणपतीच्या दोनशे मूर्ती आहेत.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.