पुणे : खासगी महिला वसतिगृहात प्रवेश करण्यास रोखल्याने घरपोहोच खाद्यपदार्थ पोहचविणाऱ्या एका कंपनीतील कामगाराने साथीदारांसह वसतिगृहाच्या व्यवस्थापाकास  मारहाण केल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली.

या प्रकरणी राेहन बाळू याच्यासह सहा जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गणेश बाळासाहेब साबळे (वय २७, रा. सुनीतानगर, वडगाव शेरी) याने या संदर्भात येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडगाव शेरी भागातील आदर्शनगर परिसरात स्मार्ट लिव्ह इन पीजी वसतिगृह आहे. वसतिगृह महिलांसाठी आहे. साबळे वसतिगृहात व्यवस्थापक आहे.

हेही वाचा >>> पुणे : बाह्यवळण मार्गावर वारज्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू; बंद पडलेल्या मोटारीच्या दरवाज्यावर आदळल्याने दुर्घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी रोहन घरपोहोच खाद्यपदार्थ पोहचविणाऱ्या कंपनीत डिलीव्हरी बाॅय आहे. रोहन खाद्यपदार्थ घेऊन वसतिगृहात आला होता. त्याला वसतिगृहात प्रवेश करण्यास व्यवस्थापक साबळे आणि सुरक्षारक्षक दीपक मंडल यांनी रोखले. आरोपी रोहनने वाद घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे साबळेने रोहनच्या कानाखाली मारली. रोहन तेथून निघून गेला. काही वेळानंतर रोहन आणि सहा साथीदार वसतिगृहात शिरले. त्यांनी दांडक्याने साबळेला बेदम मारहाण केली. साबळेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र आळेकर तपास करत आहेत.