scorecardresearch

Premium

मार्केट यार्डात मासळी, चिकन बाजारासाठी जागा देण्याचा निर्णय वादात; जैन बांधवांकडून आज मोर्चा

मार्केट यार्ड भागात मोठ्या संख्येने जैन बांधव राहायला आहेत. त्यांनी बाजार समितीच्या निर्णयास विरोध केला आहे.

dispute over decision to provide place for fish chicken market in market yard
(संग्रहित छायाचित्र)

पुणे: मार्केट यार्डातील शिवनेरी रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोकळ्या जागेत मासळी, तसेच चिकन विक्री व्यवसायास जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला. बाजार समितीने याबाबतचा ठराव मंजूर केला असून, पणन विभागाकडून या प्रस्तावास मंजुरी घेण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मार्केट यार्ड भागातील जैन बांधवांनी बाजार समितीच्या निर्णयास तीव्र विरोध केला असून, आज जैन बांधवांकडून मोर्चा काढण्यात येणार आहे.

मार्केट यार्डातील शिवनेरी रस्त्यावर बाजार समितीची मोकळी जागा आहे. या जागेत गणेश पेठेतील मासळी बाजाराच्या धर्तीवर घाऊक बाजार सुरू करण्यास या भागातील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. स्थानिक आमदार, माजी नगरसेवकांकडे नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत. या भागात नाला आहे. तेथे मासळी बाजारातील कचरा टाकल्यास आरोग्यविषयक समस्या निर्माण होतील. मोकळ्या जागेत भाडेतत्वावर मासळी, चिकन विक्रेत्यांना गाळे दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. मार्केट यार्ड भागात मोठ्या संख्येने जैन बांधव राहायला आहेत. त्यांनी बाजार समितीच्या निर्णयास विरोध केला आहे.

thane central park marathi news, thane kolshet marathi news, thane traffic jam at kolshet area marathi news
ठाणे : सेंट्रल पार्कमुळे कोंडीचे नवे केंद्र कोलशेत
मुंबई : रस्ते फर्निचर कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया?लोकायुक्तांकडे सुनावणी सुरू असताना २११ कोटींचा नवा प्रस्ताव
mumbai mnc
मुंबई : मार्वे – मनोरी जोडणाऱ्या पुलासाठी पालिकेचे एक पाऊल पुढे, चर्चा करण्यासाठी मच्छीमार संघटनांना निमंत्रण
belapur parking marathi news, belapur parking facility marathi
नवी मुंबई : बहुमजली वाहनतळ लवकरच कार्यान्वित होणार, वाशीतही वाहनतळ निर्माण करण्याचे नियोजन

हेही वाचा >>> खरीप उत्पादनात मोठय़ा घटीची भीती

बाजार समितीने मोकळ्या जागेत मासळी बाजार सुरु करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या भागात जैन बांधव मोठ्या संख्येने राहायला आहेत. या प्रस्तावास विरोध करण्यात आला असून, सोमवारी सकाळी दहा वाजता मार्केट यार्डातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, असे मार्केट यार्ड भागातील माजी नगरसेवक, दी पूना मर्चंट्स चेंबरचे माजी अध्यक्ष प्रवीण चोरबेले यांनी सांगितले.

बाजार समितीच्या मोकळ्या जागेत मासळी बाजार सुरू करण्याचा घाट घालण्यात आला आहे. या भागात मासळी बाजार सुरू करण्याची गरज नाही. ही बाब योग्य नाही. बाजार समितीच्या नवनियुक्त संचालक मंडळाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन ज्येष्ठ व्यापारी वालचंद संचेती यांनी केले.

हेही वाचा >>> टोमॅटो कवडीमोल; १५ दिवसांत दर सात रुपयांवर 

शिवनेरी रस्त्यावरील मोकळ्या जागेचा वापर सध्या वाहनतळासाठी करण्यात येत आहे. मार्केट यार्डात मोठ्या संख्येने खरेदीदार येतात. वाहनतळासाठी असणारी जागा मासळी बाजारास देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. या भागात मासळी बाजार सुरू झाल्यास परिसरात अस्वच्छता निर्माण होईल. या भागात जैन बांधव मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. –राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दी पूना मर्चंट्स चेंबर

मासळी बाजार शेतीशी निगडीत व्यवसाय आहे. शिवनेरी रस्त्यावरील मोकळ्या जागेत घाऊक मासळी बाजार होणार आहे. तेथे चिकन विक्री होणार नाही. मासळी बाजार घाऊक बाजाराचे कामकाज चार तास सुरु राहणार आहे.दिलीप काळभोर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती,पुणे

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dispute over decision to provide space for fish chicken market in market yard pune print news rbk 25 zws

First published on: 11-09-2023 at 10:25 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×