महानंद दुग्धशाळेतर्फे दुष्काळग्रस्त भागातील छावण्यांमधील जनावरांना मोफत पशुखाद्य वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरूवात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बुधवारी (१ मे) दुपारी ३ वाजता कात्रज डेअरीमध्ये होणार आहे.
दुष्काळाची भीषण परिस्थिती लक्षात घेऊन महानंदतर्फे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. दर आठवडय़ाला ४ किलो प्रती जनावर असे जुलैपर्यंत वाटप करण्यात येणार आहे. औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, सातारा, पुणे, सांगली आणि सोलापूर जिल्ह्य़ातील एकूण १००९ छावण्यांमध्ये पशुखाद्याचे वाटप करण्यात येणार आहे. गुजरात राज्य सरकारच्या मेहसाणा, अमूल आणि साबर डेअरीतर्फे हे पशुखाद्य महानंदला मोफत देण्यात आले आहे. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, जलसंपदा मंत्री रामराजे निंबाळकर, पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे व इतर उपस्थित राहणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 1st May 2013 रोजी प्रकाशित
दुष्काळी जनावरांसाठी ‘महानंद’ तर्फे आजपासून पशुखाद्याचे वाटप
महानंद दुग्धशाळेतर्फे दुष्काळग्रस्त भागातील छावण्यांमधील जनावरांना मोफत पशुखाद्य वाटप करण्यात येणार आहे.
First published on: 01-05-2013 at 01:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distribution of free brutes edible for famine stricken cattles by mahanand