पुणे : शहरातील एका नामवंत वैद्यकीय शैक्षणिक संस्थेतील प्रशिक्षणार्थी डॉक्टर युवतीच्या खोलीत छुपे कॅमेरे लावणाऱ्या एका डॉक्टरला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. डॉ. सुजित आबाजीराव जगताप (वय ४२) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तक्रारदार युवती डॉक्टर वैद्यकीय शैक्षणिक संस्थेच्या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी म्हणून काम करते. शैक्षणिक संस्थेच्या आवारातील निवासी वसतिगृहात राहायला आहे. गेल्या आठवडय़ात खोलीतील दिवे बंद असल्याने तिने विद्युत दुरुस्ती करणाऱ्या कर्मचाऱ्याला बोलाविले. त्या वेळी खोलीत छुपे कॅमेरे (स्पाय कॅमेरे) लावण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली होती. पोलिसांनी संशयावरून वसतिगृहातील कर्मचारी, सुरक्षारक्षकांची चौकशी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी वसतिगृहाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले. चित्रीकरणात डॉ. जगताप वसतिगृहात गेल्याचे आढळून आले होते. डॉ. जगताप याची पोलिसांनी चौकशी केली.गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक संगीता यादव तपास करत आहेत. या प्रकरणात डॉ. जगताप याला न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor puts hidden camera doctor room pune ssh
First published on: 14-07-2021 at 01:45 IST