राज्यातील अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी ऑनलाइन पद्धतीनेच केली जाणार आहे. विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट, अर्थिक दुर्बल घटक पात्रता प्रमाणपत्र अकरावी प्रवेशासाठीच्या संकेतस्थळावर अपलोड करावी लागणार असून, प्रवेश अर्ज भरतानाच कागदपत्रे अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही.

सर्व कागदपत्रे मिळवण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी सुरू करावी –

केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष औदुंबर उकिरडे यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ओबीसी, एस.सी, एस.टी, व्हीजे. एनटी, एस. बी. सी. या प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र, व्हीजे, एनटी, ओबीसी आणि एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलेयर प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना (इडब्ल्यूएस) आर्थिक दुर्बल घटक पात्रता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. ही सर्व कागदपत्रे मिळवण्याची प्रक्रिया विद्यार्थ्यांनी सुरू करण्याची सूचना परिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

तसेच अपंग, प्रकल्पग्रस्त-भूकंपग्रस्त, आजी-माजी सैनिकाचे पाल्य, स्वातंत्र्यसैनिकाचे पाल्य आणि बदलीने आलेल्या कर्मचाऱ्यांचे पाल्य यांनाही संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील. या सर्व कागदपत्रांची पडताळणी ऑनलाइन पद्धतीने केली जाईल. गरज पडल्यास कागदपत्रांची पडताळणी ऑफलाइन पद्धतीने शाळा स्तरावरून केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थी, पालकांना ऑनलाइन मार्गदर्शन –

प्रवेशासाठीची आवश्यक कागदपत्रे कशी अपलोड करायची याबाबत शिक्षण विभागाकडून विद्यार्थी आणि पालकांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात येईल. जाणार असून ११ मे रोजी युट्युब, फेसबुकद्वारे मार्गदर्शन करण्यात येईल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कागदपत्रे  आणि सक्षम प्राधिकारी तक्ता –

१.जात प्रमाणपत्र –  सक्षम प्राधिकारी महसूल विभाग
२.नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट –  सक्षम प्राधिकारी महसूल विभाग
३.आर्थिकदृष्ट्या दुर्बल पात्रता प्रमाणपत्र  –  सक्षम प्राधिकारी महसूल विभाग
४.अपंग प्रमाणपत्र -जिल्हा शल्य चिकीत्सक, अधिष्ठाता
५.प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त  – जिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी
६.बदलीने आलेल्या कर्मचाऱ्याचा पाल्य –  संबंधित कार्यालय प्रमुख
७.आजी-माजी सैनिक पाल्य – संबंधित प्राधिकारी
८.स्वातंत्र्यसैनिक पाल्य  –  जिल्हाधिकारी
९.आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू  – जिल्हा क्रीडा अधिकारी, क्रीडा उपसंचालक
१०.अनाथ – विभागीय उपायुक्त, महिला व बालकल्याण