पुणे : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरूपदी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य विभागाच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर यांची निवड करण्यात आली. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांनी या संदर्भातील अधिसूचना बुधवारी प्रसिद्ध केली.