पिंपरी-चिंचवडमधील देहूरोड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जवळपास एक लाख अनुयायांनी आज महाबुद्धवंदना म्हटली. येथील भव्य अशा पटांगणात असंख्य अनुयायी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करून रांगेत बसलेले होते. त्यामुळे देहूरोड येथील वातावरण बुद्धमय झाले होते.
२५ डिसेंबर १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देहूरोड येथे भगवान बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. या ऐतिहासीक दिवसाला आज ६५ वर्ष पुर्ण झाली आहेत. या निमित्त जवळपास एक लाख अनुयायीनी महाबुद्धवंदना म्हटली.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
या ठिकाणी, शेकडो पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पिंपरी-चिंचवड शहराजवळ असलेल्या धम्मभूमीवर जवळपास एक लाख अनुयायांच्या साक्षीने व शंभर भंतेजींच्या उपस्थितीत धम्म वंदनेचे आयोजन करण्यात आले होते.