पुणे : वन्यजीव संशोधन आणि संवर्धन परिषदेच्या शास्त्रज्ञ डॉ. प्राची मेहता यांना घुबडांबाबत त्यांनी केलेल्या संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय घुबड केंद्राकडून गौरवण्यात आले आहे. ‘आऊल हॉल ऑफ फेम’ असे या पुरस्काराचे नाव आहे. डॉ. मेहता या रान िपगळा (फॉरेस्ट ऑऊलेट) या घुबडांच्या प्रकारावर संशोधन करत असून  नामशेष समजल्या जाणाऱ्या या घुबड प्रकारातील पक्षी आढळल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रानिपगळा हे केवळ भारतात आढळणारे एक दुर्मिळ प्रकारातील घुबड आहे. १८८४ मध्ये एफ. आर. ब्लेविट या ब्रिटिश अधिकाऱ्याने ओरिसामध्ये या घुबडाचा शोध लावला. त्यानंतर दीर्घकाळापर्यंत ते न आढळल्याने ते नामशेष झाल्याचे मानण्यात आले. घुबड हा निशाचर पक्षी समजला जातो. रानिपगळा ही घुबडाची जात दिवसा सक्रिय राहणारी आणि लहान जात आहे. मध्य भारतात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यात तब्बल १२ ठिकाणी या प्रजातीचे वास्तव्य आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr prachi mehta research work scientist ysh
First published on: 24-02-2022 at 00:07 IST