शिरुर : शिरुर नगरपरिषदेची प्रारुप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून, आता नगरसेवकांची संख्या २१ वरून २४ झाली आहे. प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती आणि सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली असून, नागरिकांना हरकती आणि सूचना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हरकती आणि सूचना या नगरपरिषद कार्यालयातील आवक-जावक विभागामध्ये लेखी स्वरूपात स्वीकारल्या जाणार आहेत. मुदतीत आलेल्या हरकतींवर सुनावणी घेतली जाणार असल्याचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, या नगरपरिषदेच्या मागील निवडणुकीत २१ नगरसेवक होते. ही संख्या आता २४ झाली आहे. दोन सदस्यीय १२ प्रभाग असणार आहेत. सदस्यसंख्या वाढल्यामुळे इच्छुकांची संख्याही वाढली आहे.