समाजात वावरत असताना मुलींवर अनेक र्निबध लादले जातात, कुटुंबातही मुलींना कसे वागावे याचे धडे दिले जातात; खरे तर हे र्निबध नसून पालकांना आपल्या किशोरवयीन मुलींबद्दल असणारी काळजी असते. म्हणून किशोरवयीन मुलींनी आपल्या पालकांसोबत मत्रीपूर्ण समन्वय ठेवून त्यांचा विश्वास संपादन करावा, असे प्रतिपादन महापालिकेच्या नागरवस्ती विभागातील समुपदेशक सुजाता करवंदे यांनी केले.
यशवंतराव चव्हाण सभागृहात डीएव्हीपीच्या वतीने ‘विकासाची नवी झेप’ या केंद्र शासनाच्या विकासात्मक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त कोथरूड येथील एकात्मिक बालविकास सेवा योजना कार्यालयाच्या वतीने किशोरवयीन मुलींसाठी प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी उपस्थित मुलींना करवंदे यांनी मार्गदर्शन केले. डीएव्हीपीचे सहायक संचालक नंजुदास्वामी, रत्नागिरी क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे सहायक आलिम खान, बालविकास प्रकल्प अधिकारी पी. बी. शिर्के, श्रीमती ठुसे, गौरी सोनावणे आदींची या वेळी उपस्थिती होती.
करवंदे यांनी महिलांसंबंधीचे कायदे व हक्क, विवाह कायदा या विषयी माहिती दिली. तसेच स्नेहा फोउंडेशनच्या गौरी सोनावणे यांनी ‘शरीरशास्त्र व वैयक्तिक स्वच्छता, समज गरसमज’ या विषयावर; तर श्रीमती ठुसे यांनी ‘किशोरवयीन मुलींसाठी पोषण आहार’ या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात प्रश्नमंजूषा स्पध्रेचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरे देणाऱ्या मुलांनी प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. टी. जायभाये यांनी, तर संचालन गायत्री चौहान यांनी केले.