सततच्या पावसामुळे शहरभरात जागोजागी खड्डे पडले असून ते तातडीने बुजवण्यात यावेत. पिंपरीतील स्मशानभूमीतील अतिक्रमण तात्काळ हटवावे. यासह विविध मागण्या पिंपरी-चिंचवड शहरवासियांनी जनसंवाद सभेच्या माध्यमातून पालिका प्रशासनाकडे केल्या आहेत. पिंपरी पालिकेतील प्रशासकीय राजवटीत नागरिकांना भेडसावणाऱ्या तक्रारी, अडचणी मांडण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय साप्ताहिक जनसंवाद सभांचे आयोजन करण्यात येते. या ठिकाणी नागरिकांनी विविध अडचणी मांडल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पुणे : पत्नीला अश्लील संदेश पाठविणाऱ्या मेहुण्याचा खून ; दाम्पत्यासह चौघे अटकेत

फेरीवाल्यांचे नव्याने सर्वेक्षण करून त्यांना परवाना देण्यात यावेत. झाडांना लावण्यात आलेल्या संरक्षक जाळ्यांमुळे झाडांची वाढ खुंटली आहे, अशा झाडांच्या जाळ्या तात्काळ काढाव्यात. जलवाहिन्यांची अर्धवट कामे पूर्ण करावीत तसेच फुटलेल्या जलवाहिन्या दुरुस्त कराव्यात. कचरा संकलित करण्यासाठी घंटागाडी पाठवावी. उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाई करावी. अतिक्रमणे काढलेल्या ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घ्यावी. रस्त्यांच्या बाजूने पथदिवे लावावेत. खाजगी जागेतील बांधकामांमुळे रस्त्यावर राडारोडा पडून रहदारीस अडथळा निर्माण होतो, याबाबत संबंधितांना दंड करावा. शहरात आवश्यक ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारावेत. रस्त्याच्या मध्यभागी आणि पदपथावरील निघालेले सिमेंटचे ढोकळे तात्काळ बसवावेत, अशा सूचना व तक्रारी जनसंवाद सभेत नागरिकांनी केल्या. यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याची ग्वाही पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Empire of potholes in pimpri encroachments in graveyards too pune print news amy
First published on: 23-08-2022 at 15:57 IST