scorecardresearch

Premium

सारंग कामतेकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेनेतील ‘मास्टर माईन्ड’ कार्यकर्ता, विद्यार्थी सेनेचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सारंग कामतेकर यांची कोणतेही ठोस कारण न देता पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे.

सारंग कामतेकर यांची शिवसेनेतून हकालपट्टी

शिवसेनेतील ‘मास्टर माईन्ड’ कार्यकर्ता, विद्यार्थी सेनेचे माजी प्रदेश उपाध्यक्ष सारंग कामतेकर यांची कोणतेही ठोस कारण न देता पक्षातून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. मावळ लोकसभेच्या िरगणातील उमेदवार श्रीरंग बारणे व खासदार गजानन बाबर यांच्यातील संघर्षांतून ही कारवाई करण्यात आल्याचे मानले जाते.
गेल्या अनेक वर्षांपासून सेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी विशेषत: ‘मातोश्री’शी जवळीक असलेले कामतेकर स्थानिक राजकारणात खासदार गजानन बाबर यांचे निकटवर्तीय आहेत. खासदार असूनही बाबरांची उमेदवारी कापण्यात आली व श्रीरंग बारणेंची वर्णी लागली. तेव्हा संगनमताने तिकीट विकल्याचा आरोप करत बाबरांनी पक्ष सोडला. त्यानंतर, त्यांच्या अनेक समर्थकांनी पदांचे राजीनामे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवले. बाबर समर्थक गट मनसेत जाणार की स्वतंत्रपणे िरगणात उतरणार, अशी चर्चा असतानाच बाबर यांच्यासाठी उमेदवारी अर्ज नेण्यात आला. या घडामोडींमुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचे व टोकाचे मतभेद निर्माण झाल्याचे चित्र पुढे आले. याचे ‘सुत्रधार’ कामतेकर आहेत, असा संशय ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. कामतेकर यांनी सातत्याने शिवसेनेचे नाव चर्चेत ठेवले. िपपरी पालिकेतील अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांनी चव्हाटय़ावर आणली. राष्ट्रवादीला नाकीनऊ आणणाऱ्यांमध्ये कामतेकर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. कामतेकर यांची हकालपट्टी झाल्याने बारणे-बाबर यांच्यातील सत्तासंघर्षांत त्यांचा राजकीय बळी गेल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे.
‘मावळ’ची जबाबदारी शशीकांत सुतारांकडे
मावळ लोकसभेच्या संपर्कप्रमुखपदाची जबाबदारी डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे होती. यापुढे ती उपनेते शशीकांत सुतार यांच्याकडे देण्यात आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. यापूर्वी, शिरूर लोकसभेची जबाबदारी डॉ. गोऱ्हे यांच्याकडे होती. तथापि, खासदार शिवाजीराव आढळराव यांनी गोऱ्हेंविषयी तक्रार केल्यानंतर गजानन कीर्तीकर यांच्याकडे शिरूर मतदारसंघ देण्यात आला होता.

Nana-Patole
काँग्रेस पक्षात गटबाजी नाही, तर रविंद्र धंगेकर आजारी असल्याने बैठकीला आले नाही : नाना पटोले
Ramp walk by Varsha Praful Patel
सौ. वर्षा प्रफुल्ल पटेल यांचा रॅम्प वॉक…
raid jawahar yarn mill Kunal Patil, state working president Congress Dhule
धुळ्यात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील यांच्या जवाहर सूतगिरणीवर छापा
B K Hariprasad
कर्नाटक : काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर, बड्या नेत्याची मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर टीका!

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Expulsion of sarang kamtekar in shiv sena

First published on: 23-03-2014 at 02:52 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×