‘द फग्र्युसोनियन्स’ या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेच्या वतीने दिला जाणारा ‘फग्र्युसन गौरव’ पुरस्कार 17padgaonkarयंदा ख्यातनाम गायिका डॉ. प्रभा अत्रे यांना जाहीर झाला आहे. तर, ‘फग्र्युसन अभिमान’ हा पुरस्कार रिअर अॅडमिरल दिनेश देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाडगांवकर, स्वातंत्र्य सेनानी एन. सी. ऊर्फ नाना जोशी, ज्येष्ठ क्रीडापटू सिंधूताई हळबे यांना देण्यात येणार आहे.
द फग्र्युसोनियन्स माजी विद्यार्थी संघटनेचे चेअरमन अॅड. विजय सांवत यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. या वेळी संघटनेचे सचिव यशवंत मोहोड उपस्थित होते. हा पुरस्कार वितरण सोहळा जानेवारी २०१५ मध्ये होणार आहे. विविध क्षेत्रात अलौकिक कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. तसेच पुरस्कार वितरण सोहळ्यात फग्र्युसन महाविद्यालयात शिक्षण घेत असताना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या दोन विद्यार्थ्यांचाही प्रोत्साहनार्थ सत्कार या वेळी करण्यात येणार आहे.17nc-joshi