पुण्यातील शुक्रवार पेठ पोलिस चौकी शेजारील तीन मजली वाड्याला बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. याच दरम्यान वाड्याची भिंत कोसळून चार जवान जखमी तर एका नागरिकाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
Maharashtra: One dead after fire broke out at a three-storey building in Pune's Shukrawar Peth in early morning hours, now doused. pic.twitter.com/7ZSVht54bJ
— ANI (@ANI) May 3, 2017
अग्निशामक दलाच्या आधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार पेठ पोलिस चौकी शेजारील तीन मजली वाड्याला बुधवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु असतानाच वाड्याची भिंत कोसळली. या घटनेत ४ जवान आणि त्या भागातील नागरिक प्रवीण बन्सल (वय ४५) हे ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्या सर्वांना परिसरातील एका खासगी रूग्णालयात उपचारासाठी तत्काळ हलवण्यात आले. उपचार सुरु असताना बन्सल यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. ही भीषण आग विझविण्यासाठी आग्निशामक दलाचे १५ बंब लागले. आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.