टिळक रस्त्यावरील इंद्रायणी सोसायटीच्या पाíकंगमध्ये असलेल्या इलेक्ट्रिक डीपीमध्ये शॉट सíकट होऊन आग लागल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. या आगीत सोसायटीच्या तीन मजल्यांना झळ बसून मोठे नुकसान झाले. या सदनिकामधील नागरिकांना आणि सिलिंडर बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशामक दलाच्या जवानांनी पाऊण तासात ही आग आटोक्यात आणली.
अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, टिळक रस्त्यावरील शक्ती स्पोर्टच्या पाठीमागे इंद्रायणी सोसायटी आहे. ही इमारत तीन मजल्याची असून यामध्ये साधारण बारा सदनिका आहेत. या सोसायटीच्या पार्किंगमध्ये इलेक्ट्रिकची डीपी असून त्यामध्ये शॉटसíक ट होऊन शनिवारी दुपारी एकच्या सुमारास आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या एक गाडी घटनास्थळी पोहोचली. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. मोठय़ा प्रमाणात धूर निघत होता. अग्निशामक दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे यांनी दोन पथक करून आग विझविण्याच्या कामास लावले. दुसरे पथक इमारतीमध्ये कोणी अडकले का याचा शोध घेऊ लागले. इमारतीत अडकलेल्या नागरिकांना धीर देऊन त्यांना बाहेर काढले. आग वाढत असल्यामुळे आणखी एक गाडी आणि पाण्याचा टँकर बोलविण्यात आला. साधारण पाऊण तासाच्या प्रयत्नानंतर ही आग विझविण्यात यश आले. मात्र, दुपारी तीनपर्यंत एक गाडी त्या ठिकाणी थांबविण्यात आली होती. या आगीत तीनही मजल्यावरील सदनिकांना झळ बसली असून त्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहेत. या घटनेत सुदैवाने कोणालाही जखम झालेली नाही. आग लागलेली इमारत ही आतमध्ये असल्यामुळे अग्निशामक दलाची गाडी त्या ठिकाणी घेऊन जाता आली नाही.