रशियन विद्यापीठांसाठीचा भारतातील अधिकृत प्रवेश विभाग असलेल्या ‘एन्डय़ुरशिया’तर्फे विद्यार्थ्यांसाठी विनामूल्य चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र १५ एप्रिल रोजी हॉटेल ल मेरेडियन येथे सकाळी १० वाजता होणार आहे.
रशियातील राज्य आणि सरकारी विद्यापीठांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, एमडी, एमएस, एमडीएस, अभियांत्रिकी पदवीपूर्व व पदव्युत्तर आणि एमबीए अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चर्चासत्र आणि समुपदेशन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अनास्टसिया साझोनोवा आणि अॅलेना माकारोवा या रशियन प्रतिनिधी तसेच इन्डय़ुरशियाचे मनोज पत्की चर्चासत्रात मार्गदर्शन करणार आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी यावर्षी बारावीची परीक्षा दिली आहे आणि ज्यांना निकालाची प्रतीक्षा आहे, त्यांच्यासाठी रशियातील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये प्रवेश नोंदणी सुरू झाली आहे. या चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी ९९२०८६८७२७ / ९७६९५५९८५५ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.