पुणे : राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेला (एफटीआयआय) अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याबाबत केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत शनिवारी चर्चा झाली. ‘एफटीआयआय’ला जागतिक स्तरावर नेण्याच्या अनुषंगाने त्यांनी विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधला.

चित्रपट आणि दूरचित्रवाणी संदर्भात प्रशिक्षण देणारी एफटीआयआय ही संस्था माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारित आहे. त्यामुळे माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच वैष्णव यांनी ‘एफटीआयआय’ला भेट दिली. या भेटीमध्ये त्यांनी संस्थेतील विविध सोयीसुविधांची पाहणीही केली.

BCCI Vice President Rajeev Shukla statement on Gautam Gambhir Rohit Sharma sports news
गंभीर, रोहितमध्ये मतभेद नाहीत!‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्लांचे वक्तव्य
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Infosys Cognizant controversy
Infosys Vs Cognizant: नामांकित आयटी कंपन्यांनी एकमेकांविरुद्ध खटले का दाखल केले? नेमका वाद काय?
Teja, Pune Police Force , bomb detection ,
पुणे पोलीस दलाच्या बॉम्बशोधक-नाशक पथकातील ‘तेजा’ला भावपूर्ण निरोप
jitendra awhad sharad pawar (1)
शरद पवारांकडून RSS चं कौतुक, भाजपाशी जवळीक वाढल्याची चर्चा; आव्हाड म्हणाले, “आम्ही संघाच्या विचारसरणीचं…”
CM Devendra Fadnavis Nagpur Interview
Devendra Fadnavis : कठोर राजकारणी कोण मोदी की अमित शाह? देवेंद्र फडणवीसांनी काय उत्तर दिलं?
CBSE instructed affiliated schools to publish staff and other information on their websites
संकेतस्थळावर माहिती, कागदपत्रे जाहीर न करणाऱ्या शाळांवर कारवाई; सीबीएसईचा इशारा
Maharashtra News Live Updates in Marathi
Maharashtra News Updates : महापालिका निवडणूक मनसे महायुतीबरोबर लढवणार का? मनसे नेत्याचं मोठं विधान

‘एफटीआयआय’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्याच्या अनुषंगाने विद्यार्थी, शिक्षकांच्या प्रश्नांना उत्तरे देताना त्यांनी गतिशक्ती विश्वविद्यालयाचे उदाहरण देऊन, ही संस्था अल्प कालावधीत जगासाठी गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ पुरवत असल्याचे नमूद केले. विद्यार्थी, शिक्षकांशी संवाद साधताना वैष्णव यांनी देशातील चित्रपट शिक्षणाविषयीचे त्यांचे विचार मांडले. तसेच, विद्यार्थ्यांना अधिक करिअरसंधी प्राप्त होण्यासाठी उद्योगांशी अधिक सहकार्य करण्यावर त्यांनी भर दिला.

हेही वाचा – पुणे : अपहरण करणारे गजाआड, गुन्हे शाखेची कारवाई, आर्थिक व्यवहारातून अपहरण

हेही वाचा – ‘अभिनव’चे माजी प्राचार्य रावसाहेब गुरव यांचे निधन

नव्या सभागृहाचे उद्घाटन

संस्थेत उभारण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटनही वैष्णव यांनी केले. या ५८६ आसनक्षमता असलेल्या सभागृहात प्रोजेक्टर, पीए सिस्टीम, सराउंड साउंड अशी आधुनिक व्यवस्था करण्यात आली आहे. ५० फूट रुंद आणि २० फूट उंच असा भव्य पडदा या चित्रपटगृहात आहे. विशेष म्हणजे या पडद्याचे संचालन रिमोट कंट्रोलद्वारे करून सभागृहाचे चित्रपटगृहात रूपांतर करणे शक्य आहे. पहिल्यांदाच अशी अनोखी व्यवस्था विकसित करण्यात आली असून, त्यासाठीच्या एकस्व अधिकारासाठी (पेटंट) ‘एफटीआयआय’ने अर्ज केला आहे. नवे सभागृह ‘एफटीआयआय’च्या अध्यापनासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader