पुण्यातील उरुळी कांचन येथे गॅंगवॉर; गोळीबारात दोघांचा मृत्यू

पूर्ववैमनस्यातून ही घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

crime-13
(प्रातिनिधीक फोटो)

पुणे सोलापूर रोडवरील उरुळी कांचन येथील हॉटेल सोनई समोर वाळू व्यावसायिक संतोष जगताप यांच्यावर चार ते पाच जणांनी भरदिवसा गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला असून हल्लेखोरांवर प्रतिहल्ला देखील करण्यात आला. यामध्ये स्वागत खैरेचा मृत्यू झाला असून ही घटना पूर्ववैमनस्यातून घडल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील मुख्य चौकातील हॉटेल सोनाई समोर संतोष जगताप आणि त्याचे दोन अंगरक्षक थांबले होते. तेवढ्यात एका चार चाकी वाहनातून चार ते पाच जण आले त्यांनी संतोष जगताप च्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये संतोष हा गोळ्या लागताच खाली कोसळला. संतोषच्या सोबत असलेले खासगी अंगरक्षकांनी देखील हल्लेखोरांवर जवळील पिस्तूल मधून गोळ्या झाडल्या. यामध्ये स्वागत खैरेचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर घटना स्थळावरून काही मिनिटात आरोपी पसार झाले आहेत.

यामध्ये संतोष जगताप याचे दोन्ही अंगरक्षक जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आले आहेत. मयत संतोष जगताप आणि मयत हल्लेखोर स्वागत खैरे या दोघांवर यापुर्वी देखील गुन्हे दाखल आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gangwar at uruli kanchan in pune both killed in the shooting srk 94 svk