पुणे : सामिष खवय्यांनी हजारो किलो मटण, मासळी, चिकनवर ताव मारुन बुधवारी ‘गटारी’ साजरी केली. मटण, चिकन, मासळी खरेदीसाठी सकाळपासून बाजारात गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

आषाढ महिन्याची सांगता गुरुवारी (२४ जुलै) होणार आहे. श्रावण महिन्याचा प्रारंभ शुक्रवारी (२५ जुलै) होणार आहे. आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी असलेल्या दीप अमावस्या असे म्हटले जाते. श्रावण महिन्यात सामिष पदार्थ वर्ज्य केले जातात. श्रावण महिन्यानंतर गणेशोत्सवाचा प्रारंभ होतो. गणेशोत्सवानंतर नवरात्रौत्सवातही सामिष पदार्थ वर्ज्य केले जातात. आषाढ महिन्यातील शेवटच्या दिवशी येणाऱ्या अमावस्येला खवय्यांच्या भाषेत गटारी असे संबोधिले जाते. गटारी अमावस्येला घरोघरी सामिष पदार्थ तयार केले जातात. अनेकजण मित्रपरिवार, नातेवाईकांसोबत बेत आखतात. यंदा आषाढ महिन्याची सांगता गुरुवारी होणार आहे. गुरुवारी शक्यतो सामिष पदार्थांचे सेवन वर्ज्य मानले जाते. त्यामुळे खवय्यांनी बुधवारी चिकन, मटण, मासळीवर ताव मारून गटारी साजरी केली.

खवय्यांची सकाळपासून मटण, मासळी, चिकन खरेदीसाठी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. गणेश पेठेतील मासळी बाजार, कसबा पेठेतील मटण, मासळी बाजार, विश्रांतवाडीतील मासळी बाजार, तसेच लष्कर भागातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटसह शहर, तसेच उपनगरातील बाजारात खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.

५० टन मासळीची आवकगणेश पेठेतील मासळी बाजारात खोल समुद्रातील मासळी २० ते २५ टन, नदीतील मासळी एक ते दोन टन, आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलनची २० ते २५ टन अशी आवक झाली. सकाळपासून मासळी खरेदीसाठी गर्दी झाली होती. पापलेट, सुरमई, वाम, रावस, कोळंबी, ओले बोंबील या मासळीला चांगली मागणी राहिली, अशी माहिती गणेश पेठ मासळी बाजारातील प्रमुख व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.

६०० ते ७०० टन चिकनची विक्री

चिकनला चांगली मागणी राहिली, पुणे, तसेच पिंपरी-चिंचवड शहर परिसरात बुधवारी ६०० ते ७०० टन चिकनची विक्री झाली. अंड्याच्या दरात शेकड्यामागे ३० रुपयांनी घट झाली. चिकनचे दर स्थिर असल्याचे पुणे बाॅयलर असोसिएशनचे संचालक रुपेश परदेशी यांनी सांगितले.

हाॅटेलचालकांकडून मटणाला चांगली मागणी राहिली. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर परिसरात अडीत ते तीन हजार शेळी, मेढींची खरेदी करण्यात आली. पुणे, तसेच शेजारील जिल्ह्यातील बाजारातून मटण विक्रेत्यांनी शेळी, मेंढीची खरेदी केली. – प्रभाकर कांबळे, अध्यक्ष, पुणे हिंदू खाटीक मटण दुकानदार संघटना

मटण, मासळी, चिकनचे किलोचे दर

मटण – ७८० रुपये

चिकन – २०० रुपये

पापलेट – १२०० ते १८०० रुपये

सुरर्मई – १००० ते १४०० रुपये

वाम – १००० रुपये

रावस – १००० रुपये

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोळंबी – ४०० ते ७०० रुपये