देशाचे लष्करप्रमुख जनरल विक्रमसिंह १ फेब्रुवारी रोजी पुणे भेटीवर येणार असून खडकी येथे होणाऱ्या पीईजीच्या ‘पुनर्मीलन’ या संमेलनात उपस्थित राहणार आहेत. पुणे भेटीत विक्रमसिंह दक्षिण क्षेत्रातील परिचलनात्मक सज्जतेचा आढावा घेणार आहेत. या वेळी दक्षिण क्षेत्रातील प्रमुखधिकारी लेफ्टनंट जनरल अशोक सिंग त्यांना यासंबंधीची माहिती देणार आहेत. दर चार वर्षांनी होणारे हे संमेलन यंदा पुण्यात २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. या संमेलनाच्या समारोपाला लष्कर प्रमुखांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यानिमित्ताने आंतर-रेजिमेंट क्रॉसकंट्री स्पर्धा आणि इंद्रधनुष्य चमूतर्फे पॅरा-मोटार-डिस्प्ले, विशेष संचलन करण्यात येणार आहे. तसेच विविध मनोरंजनपर कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात निवृत्त अधिकारी, जवान एकत्र येणार आहेत.