खडकी परिसरातील स्वस्त धान्य विक्री करणाऱ्या दुकानावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी स्वत: बुधवारी रात्री छापा घातला.

खडकी परिसरातील एका स्वस्त धान्य विक्री दुकानातून काळ्याबाजारात  धान्याची विक्री होत असल्याची माहिती गिरीश बापट यांना मिळाली होती. त्यानुसार बापट यांनी बुधवारी रात्री छापा घातला. त्यानंतर बापट यांनी या घटनेची माहिती अन्न धान्य पुरवठा विभाग आणि पोलिसांना दिली.

पिंपरी विभागाचे सहायक आयुक्त मोहन विधाते यांनी घटनास्थळी भेट दिली असून काळयाबाजारात धान्य विक्री करणाऱ्या विक्रेत्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरु होती.