व्यायामशाळा प्रशिक्षकावर बलात्काराचा गुन्हा

आरोपी चौगुले एका व्यायामशाळेत प्रशिक्षक आहे. 

(संग्रहित छायाचित्र)

पुणे : शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन एका युवतीवर बलात्कार केल्या प्रक रणी व्यायामशाळेतील प्रशिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  याबाबत एका युवतीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार दीपक चौगुले (रा. पिंपरी-चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी चौगुले एका व्यायामशाळेत प्रशिक्षक आहे.  दोन दिवसांपूर्वी त्याने युवतीला व्यायामशाळेत बोलावून घेतले. तिला शीतपेयातून गुंगीचे औषध दिले. युवतीवर बलात्कार केला. त्याने युवतीची छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित करण्याची धमकी दिली, असा आरोप आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Girl file rape case on gym instructor in pune zws

ताज्या बातम्या