परीक्षेसाठी १० ते २५ मार्च या कालावधीत ऑनलाइन नोंदणी

पुणे : राज्यातील शासकीय रेखाकला परीक्षा (एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट) ९ ते १२ एप्रिल दरम्यान होणार आहेत. राज्यभरातील केंद्रांवर ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी १० ते २५ मार्च या कालावधीत ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.

arun gawli marathi news, arun gawli jail marathi news
विश्लेषण: अरुण गवळीची सुटका होणार का? न्यायालयाने काय म्हटले? राज्य सरकारची भूमिका काय?
Deadline for drain cleaning in Pune till May 10 Municipal Commissioners order
पुण्यात नालेसफाईसाठी १० मेपर्यंत मुदत, महापालिका आयुक्तांचा आदेश
Brothers Arrested in for more than 12 Crore Online Ticket Scam of Tadoba Andhari Tiger Reserve
ताडोबा ऑनलाईन तिकीट घोटाळाप्रकरणी ठाकूर बंधुंना अटक; १२ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
set exam date marathi news, set exam 7th april marathi news
‘सेट’ परीक्षा ७ एप्रिल रोजी, मुंबईतील २८ केंद्रांवर १४ हजार ४२६ परीक्षार्थी परीक्षा देणार

कला संचालनालयाने या परीक्षांबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. एलिमेंटरी परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना इंटरमिजिएट परीक्षेतील श्रेणीच्या आधारे दहावीत चित्रकलेचे अतिरिक्त गुण दिले जातात. गेल्यावर्षी शासकीय रेखाकला परीक्षा होऊ न शकल्याने शैक्षणिक वर्ष २०२१-२२च्या दहावीच्या विद्यार्थ्यांना केवळ इंटरमिजिएट परीक्षेतील श्रेणीच्या आधारे अतिरिक्त गुण देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तर यंदा नववीत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एलिमेंटरी, दहावीचे विद्यार्थी आणि कला शिक्षक प्रशिक्षण पदविका (प्रथम वर्ष) अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी इंटरमिजिएट परीक्षा घेतली जाणार आहे. ९ ते २२ एप्रिल दरम्यान या ऑफलाइन पद्धतीने राज्यभरातील केंद्रांवर या परीक्षा होतील. परीक्षा केंद्रांच्या नोंदणीसाठी १५ मार्च, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी १० ते २५ मार्च, परीक्षक, समालोचक आणि उपमुख्य समालोचक नोंदणीसाठी २१ ते ३१ मार्चची मुदत देण्यात आली आहे.  तपशील http://www.doi.maharashtra.gov.in/ आणि  http://dge.doamh.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

एलिमेंटरीच्या आधी इंटरमिजिएटचा निकाल

शैक्षणिक वर्ष २०२१-२२मधील दहावीच्या विद्यार्थ्यांना सवलतीच्या गुणांचा लाभ मिळण्यासाठी इंटरमिजिएट परीक्षेचा निकाल एलिमेंटरी परीक्षेपूर्वी जाहीर करण्यात येणार असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.