पुणे : बेकायदा गुटखा वाहतूक करणाऱ्या टेम्पोचालकाला गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. या कारवाईत पोलिसांनी आठ लाख ७१ हजारांचा गुटखा, टेम्पो असा १३ लाख ८१ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सिराज नूरआलम मनसुरी (वय २९, रा. नूर मशिदीजवळ, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कोंढव्यातील येवलेवाडी भागात टेम्पोतून गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने टेम्पो अडवला. टेम्पाेची तपासणी केली असता टेम्पोत गुटखा सापडला. टेम्पोचालक मनसुरीची चाैकशी करण्यात आली. पुरंदर तालुक्यातील गोदामात गुटख्याचा साठा ठेवल्याची माहिती त्याने दिली. बोपगावमधील गोदामातून पोलिसांनी गुटख्याचा साठा जप्त केला. पोलिसांनी आठ लाख ७१ हजारांचा गुटखा, टेम्पो असा मुद्देमाल जप्त केला.

सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनील थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दिगंबर चव्हाण, एस. डी. नरके, संतोष देशपांडे, प्रशांत बोमादंडी, संदीप जाधव, मयूर सूर्यवंशी आदींनी ही कारवाई केली.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Ambala Divisional Commissioner Renu Phulia
महिला आयएएस अधिकाऱ्याने २० वर्षांपूर्वीची स्थगिती उठवली, नवरा आणि मुलाने लगेचच खरेदी केला भूखंड
5 Crore and 45 lakh embezzlement in Nandura Urban Bank
नांदुरा अर्बन बँकेत साडेपाच कोटींचा अपहार, कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन…
380 crore fraud case
३८० कोटी फसवणूक प्रकरण : आरोपीचा तीन राज्यांमध्ये १२ दिवस पाठलाग, अखेर उत्तराखंड येथून अटक