महाराष्ट्रात येत्या २ ते ४ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून यंदा राज्यात सरासरीच्या १०२ टक्के पाऊस पडण्याची शक्यता ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी आज पुण्यात व्यक्त केली. ते म्हणाले की, जून ते सप्टेंबर दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असून यंदा एलनिनोचा प्रभाव राहणार नाही. तसेच वाऱ्याचा वेग कमी आढळल्याने जून आणि जुलै महिन्यात पावसात खंड पडेल. त्याचबरोबर विदर्भ आणि मराठवाड्यातील पावसातील खंडाचा कालावधी मोठा राहण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली.