पाकिस्तानी मालिका पहाते म्हणून पत्नीवर कोयत्याने वार

पत्नीवर वार करणाऱ्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

पुण्यातील सलीसबारी पार्क येथे राहणाऱ्या एका महिलेवर तिच्या पतीने पाकिस्तानी मालिका बघते म्हणून कोयत्याने वार केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी या महिलेच्या नवऱ्याला अटक केली आहे. आसिफ नायाब असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

आसिफ नायाबची पत्नी नर्गिससह गेल्या काही वर्षांपासून सलीसबारी पार्क या ठिकाणी रहातात. या दोघांमध्ये काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. हे दोघेही एकमेकांशी बोलत नव्हते. नर्गीस या बेडरूममध्ये त्यांच्या मोबाईलवर एक पाकिस्तानी मालिका बघत होत्या. तेवढ्यात त्यांचा नवरा बेडरुममध्ये आला आणि पाकिस्तानी मालिका बघतेस त्यापेक्षा माझ्याशी बोल असे म्हणत त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. नर्गिस यांनी हा वार होऊ नये म्हणून मधे हात आणला. त्याचवेळी त्यांच्या हाताचा अंगठा तुटून बाजूला पडला. या घटनेत मोठा रक्तस्त्रावही झाला. यानंतर नर्गिस यांनी आरडाओरड केल्याने शेजाऱ्यांनी गर्दी केली. त्यावेळी हा प्रकार समोर आला. नर्गिस यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर त्यांच्या पतीला म्हणजेच आसिफला पोलिसांनी अटक केली आहे.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Husband attack on wife for watching pakistani serial on mobile in pune