भाजपा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी आज पुण्यात पत्रकारपरिषदेत राज्यातील महिला व मुलींवरील अत्याचारांच्या वाढलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका केली. यांनतर काही दिवसांपूर्वी चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधताना, शूर्पणखा असा उल्लेख केला होता. या टिप्पणीबद्दल माध्यमांनी चित्रा वाघ यांनी प्रश्न विचारला असता, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तसेच, यावेळी बोलताना त्यांनी “मला असं वाटतं की पुणेकरांची मराठी मुंबईकरांपेक्षा वीक आहे” असं देखील म्हटलं.

या मुद्य्यावर बोलताना चित्रा वाघ यांनी सांगितले की, “ शूर्पणखा म्हणजे कुणाचं नाव थोडीचं शूर्पणखा आहे. मी तर उपमा दिली होती की रावणाला मदत करणारी शूर्पणखा नको. रावण तर खूप फिरत आहेत. तीन तर रावण मीच तुम्हाला सांगितले. असे खूप आहेत त्यामुळे त्यांना मदत करणारी शूर्पणखा नको. हे काय कुणा एखाद्या व्यक्तिला म्हटलेलं नाही? कुणाचं नाव शूर्पणखा आहे का? मी असंच म्हटलं.. की कुणी पण बसवा शूर्पणखा बसवू नका. तीन पक्षाचं सरकार आहे, तुम्ही कुणालाही बसवा पण शूर्पणखेला बसवू नका. शूर्पणखा काय आहे? रावणाला मदत करणारी ती शूर्पणखा. जे मला माहिती आहे. बहीण जरी असेल आणि चुकीचा कामात रावणाला मदत करत असेल, तर ते कसं काय चालेल आम्हाला? म्हणून म्हटलं मी. कुणाचं नाव शूर्पणखा असेल किंवा ठेवलं असेल पुण्यामध्ये तर मला कळवा.”

Due to summer the price of lemon continues to increase
उन्हामुळे लिंबाची दरवाढ कायम
All the Chief Executive Officers of the Zilla Parishad were given instructions regarding the recruitment of teachers Pune print news
शिक्षक भरतीची पुढील प्रक्रिया कधीपासून? शिक्षण विभागाने काय सांगितले?
Radio images of the Sun obtained by scientists pune news
शास्त्रज्ञांनी मिळवली सूर्याच्या रेडिओ प्रतिमा
seven injured after machinery in trailer
लष्कर भागात मोटारीची दहा दुचाकींना धडक; दुचाकीस्वार तरुण जखमी

शूर्पणखा आहे की नाही हे येणाऱ्या दिवसात समजेल –

तसेच, “अजुन तर कुठे बॅटींग सुरू झाली आहे, आता ती शिकू द्या समजू द्या. नंतर बोलू की आम्ही. शूर्पणखा आहे की नाही हे येणाऱ्या दिवसात समजेल. ते नाही बोलले तरी आम्ही आहोतच. मला हे म्हणायचं आहे की अजुन कामकाज काही कुठे दिसलं नाही. एकदा जर एखाद्याला कुठलं काम दिलं तर त्याला शिकायला त्याला दोन महिने दिले पाहिजे. करू देत त्यांनी काम. तिथं शूर्पणखा नको म्हणजे रावणाला मदत करणारी नको. हे माझं म्हणणं आहे. तिथे बसलंय कोण हे महत्वाचं नाही. ते संविधानिक पद आहे. त्या संविधानिक पदाची गरीमा मला माहिती आहे मी काम केलंय महिला आयोगामध्ये. ते पद अतिशय आदाराचं आणि मानाचं आहे. म्हणूनच मी म्हटलं की अशा संविधानिक पदावर शूर्पणखा देऊ नका, म्हणजेच रावणाची बहीण देऊ नका, जी रावणाला मदत करते आणि राज्यात तर रावणच रावण फिरत आहेत सगळ्या ठिकाणी. जर त्यांनाच मदत करणारी शूर्पणखा आली तर राज्यातील महिलांचं काय होणार? हा त्याचा आशय होता.” असं चित्रा वाघ यांनी यावेळी स्पष्ट केलं.

“सत्ताधारीच जर राज्यातील महिलांना सुरक्षा पुरवत नसतील, तर त्या सत्तेला काय अर्थ आहे?”

याशिवाय,“कुठलीही महिला जेव्हा अधिकार पदावर जाते, त्यावेळी तिच्याकडून आमच्यासारख्या हजारो महिलांच्या अपेक्षा खूप वाढतात. त्यामुळे आम्हालाही अपेक्ष आहेत आणि मनापासून शुभेच्छा देखील आहेत. त्यांना जर काम करू द्या. आल्या आल्या लगेच त्यांच्यावर टीका,भडीमार असं एखाद्या महिलेला त्रास देणं बरोबर नाही. काम करू द्या, शिकू द्या नंतर पाहूयात. तुम्ही पण इथेच आहात आणि आम्ही देखील इथेच आहोत.” असंही यावेळी चित्रा वाघ यांनी बोलून दाखवलं.

रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका,” चित्रा वाघ यांचा रुपाली चाकणकरांवर अप्रत्यक्ष निशाणा

तर माध्यम प्रतिनिधीने तुम्ही मगापासून महिलांचा विषय मांडत आहात, तर एका महिलेलाच तुम्ही शूर्पणखा असं म्हणतात? असा प्रश्न उपस्थित केल्यावर चित्रा वाघ यावर म्हणाल्या की, “महिलेला नाही म्हटलं मी त्या वृत्तीला म्हटलं. मला असं वाटतं की पुणेकरांची मराठी मुंबईकरांपेक्षा वीक आहे. हे कुठल्या महिलेसाठी नाही त्या वृत्तीसाठी आहे. आपण रावणी वृत्ती म्हणतो म्हणजे काय म्हणतो? मग आता ही शूर्पणखेची वृत्ती आहे. म्हणून मी सांगितलं की रावणाची शूर्पनखा बनवू नका. मी वृत्ताला म्हटलं आहे, महिला असेल आणि ती चुकीचं काम करत असेल, तर त्याचं समर्थन करणार का आपण? एक तर दोन वर्षे झाले महिला आयोगाला अध्यक्षपद दिलं गेलं नाही. आम्ही बोंब मारून.. आंदोलन देखील केलं आहे मंत्रालयाच्या गेटवर आणि त्यानंतर कुठेतरी महिला आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक झाली. आमचं म्हणणं इतकच आहे की त्या वृत्तीची कुणी महिला बसवू नका, की जी रावणांना मदत करेल. याच्या अगोदर आम्ही बघितलं आहे आम्ही पाहीलं आहे, म्हणून मी सांगितलं आहे की तसं करू नका. कारण, आता राज्यात महिला व मुलींवर जे अत्याचाराचं सत्र आहे ते अतिशय गंभीर आहे. रोज कुठे ना कुठे घटना घडत आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी महिला आयोगासारखं एक सशक्त भूमिका निभावणारं त्या ठिकाणी माणूस पाहिजे. ”