इंदापूर : ऐन हिवाळ्यातच उजनी धरणाच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. धरणाचा पाणीसाठा ३५ टक्क्यांवर आला असून, सध्या उजनी मध्ये केवळ १८ टीएमसी (अब्ज घनफूट) पाणी चलसाठ्यात असून याच पद्धतीने पाण्याचा वापर झाला तर जानेवारी महिन्यातच धरण मोकळे होण्याची भीती व्यक्त होत आहे. आगामी दुष्काळाची दाहकता वेळीच ओळखून, शिल्लक पाण्याचे जबाबदारीने नियोजन न झाल्यास गंभीर समस्येला तोंड द्यावे लागणार आहे, असे चित्र आता स्पष्ट दिसत आहे. यावर्षी उजनी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाळ्यात सुरूवातीला पावसाने दडी मारली होती.  परतीच्या पावसात उजनी मध्ये केवळ ६० टक्के पाणीसाठा जमा झाला . धरणातून रब्बी हंगामाचे आवर्तन व भीमा सीना जोड कालव्यातून पाणी सोडण्याबरोबरच कार्तिकी एकादशीनिमित्त नदीपात्रातून पंढरपूरला पाणी सोडण्यात आल्यामुळे या आठवड्यात पाणी साठ्यात कमालीची घट होत पाणीसाठा ३५ टक्क्यांवर आला आहे.

हेही वाचा : पुण्यात सावकारीचा बळी, सावकारांच्या धमकीमुळे एकाची आत्महत्या

Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
chaturang article, maintain relationship, good relations, avoid assuming, assuming in relationship, assume, stay away from toxic people, spreading bad thoughts in relationship, husband wife
जिंकावे नि जगावेही : नात्यांमधला नीरक्षीरविवेक!
Why are naphthalene balls kept with clothes to be put away How do you use naphthalene balls in a wardrobe
कपड्यांमधील ओलसरपणा, कुबट वास होईल गायब; कपाटात ठेवा ‘ही’ गोळी, जाणून घ्या वापराची योग्य पद्धत
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या

मागील पावसाळ्यात उजनी धरण शंभर टक्के भरले होते. उजनीच्या पाणलोट व लाभक्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने   जानेवारी महिन्यापर्यंत  उजनी धरण काठोकाठ भरले होते. १०० टक्के पाणी साठा जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत उपलब्ध होता .मात्र, जानेवारीनंतर उजनीचा पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झाल्याने उन्हाळा अखेरपर्यंत उजनी धरण १०० टक्के खाली होऊन मृतसाठ्यातीलही ३६ टक्के पाणी वापरत आल्याने उजनी धरण मोकळे झाले होते. अशातच पावसानं दडी मारल्यामुळे उजनी धरणामध्ये उशिराने पाणी साठण्यास प्रारंभ झाला. मात्र पाणीसाठा पूर्ववत होत बराच अवधी लागल्याने उजनी धरण कवळ ६० टक्केच भरले.  या ६० टक्के पाण्यामधून २५ टक्के पाणी दीड महिन्यात वापरात आल्याने आगामी हिवाळा व पुढील वर्षीचा भीषण उन्हाळा पस्तीस टक्के पाण्यामध्ये निभावणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

हेही वाचा : पत्नीने नाकावर ठोसा मारल्याने पतीचा मृत्यू, लग्नाच्या वाढदिवशी गिफ्ट न दिल्याने संताप; पुण्यातली घटना

आता उजनीच्या पाण्याचा यंदा सुरुवातीपासूनच मोठा वापर सुरू झाला असल्याने दुष्काळाच्या खाईत उजनी धरणावर अवलंबून असलेल्या लोकांची पाण्यासाठी पायपीट होण्याची शक्यता निर्माण झाली असून ऐनवेळी शासन नेमकी कोणती उपाययोजना करणार, याकडे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. वीस वर्षांपूर्वी पडलेल्या भीषण दुष्काळात खडकवासला धरणातून दहा टीएमसी पाणी उजनी धरणामध्ये सोडण्यात आले होते. मात्र सध्या खडकवासला धरणावर अवलंबून असलेल्या शेतीच्या पाण्याच्या आवर्तनातच मोठी तफावत आढळून येत असून, पुणे शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा दररोजच वाढत असल्यामुळे या पुढच्या काळामध्ये खडकवासला धरणाचे पाणी शेतीसाठी व ऐनवेळी उजनी धरणामध्ये सोडण्यासाठी कितपत मिळू शकेल याबाबत शंका व्यक्त होत आहे . अनेक सहकारी साखर कारखाने, खाजगी कारखाने, औद्योगिक वसाहतींनाही उजनीच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागत असल्याने उजनीच्या पाण्याचे नियोजन करताना त्याबाबत विचार होणे गरजेचे आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.