पुणे : मावळ तालुक्यातील कोथुर्णे गावातील साडेसहा वर्षांच्या बालिकेचे अपहरण, तसेच लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणाऱ्या आरोपी तरुणाला पुण्यातील विशेष न्यायालयाने शुक्रवारी फाशीची शिक्षा सुनावली. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तरुणाच्या आईला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. कोथुर्णे गावात बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आल्यानंतर राज्यभरात या घटनेचे पडसाद उमटले होते. संवेदनशील खटल्याची जलदगतीने सुनावणी घेऊन विशेष न्यायाधीश बी. पी. क्षीरसागर यांनी आरोपीला शिक्षा सुनावली.

तेजस उर्फ दादा महिपती दळवी (वय २४) असे फाशीची सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याची आई सुजाता महिपती दळवी , दोघेही रा. कोथुर्णे, पवननानगर, ता. वडगाव मावळ, जि.पुणे) हिला सात वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. याबाबत बालिकेच्या वडिलांनी कामशेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. २ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी घडली होती. नागपंचमी निमित्त शाळेला सुटी असल्याने बालिका घरासमोर खेळत होती. घरासमोर खेळणारी बालिका बेपत्ता झाल्यानंतर गावात खळबळ उडाली होती.

Solapur, Aba Kamble murder case,
सोलापूर : खून का बदला खून; आबा कांबळे खून खटल्यात वृद्ध पैलवानासह सातजणांना जन्मठेप
Sassoon, pune, Sassoon dean,
ससूनमध्ये वाद पेटला! आयुक्तांच्या निर्णयाच्या विरोधात अधिष्ठात्यांची थेट भूमिका
girl Bangladesh sexually assaulted,
डोंबिवलीतील पलावा गृहसंकुलात दोन भावांकडून बांगलादेशमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
A case has been registered against a minor in connection with the death of a student in a municipal school
महापालिका शाळेतील विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल

हेही वाचा : एमएचटी-सीईटीसह विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकात बदल, सीईटी सेलकडून सुधारित वेळापत्रक जाहीर

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कामशेत पोलीस, तसेच ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. ३ ऑगस्ट रोजी दुपारी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारातील दाट झाडीत बालिकेचा मृतदेह सापडला. आढळला. बालिकेवर अत्याचार करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर गावात घबराट उडाली. पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल झाल्यानंतर २४ तासाच्या आत बालिकेच्या घराशेजारी राहणारा आरोपी तेजस दळवीला अटक केली.

हेही वाचा : “डॉ. आंबेडकरांच्या आचरणात शोषणमुक्त समाजाचा पाया”, डॉ. मोहन भागवत यांचे मत

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीच्या घराची पाहणी करण्यात आली. खाटेवर आणि न्हाणीघरातील फरशी आणि बादलीवर रक्ताचे डाग आढळून आले. आरोपीने वापरलेला चाकू, बालिकेचे कपडे, तिच्या कानातील रिंग आढळून आली. पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी गुन्ह्याचा तपास केला. या खटल्यात विशेष सरकारी वकील ॲड. राजेश कावेडिया यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून २९ साक्षीदारांची साक्ष नोंंदविण्यात आली. बालिकेला आरोपीसोबत गावातील एका महिलेने पाहिले होते. शवविच्छेदन अहवाल, आरोपीची वैद्यकीय तपासणी करणारे वैद्यकीय तज्ज्ञ आणि आरोपीच्या घरझडतीच्या वेळी उपस्थित असलेल्या सरकारी पंचांची साक्ष महत्त्वाची ठरली. आरोपीने वासना शमविण्यासाठी बालिकेवर बलात्कार करुन तिचा खून केला असून, त्याला फाशीची शिक्षा द्यावी, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकिलांनी केला. कठोर शिक्षेसाठी त्यांनी सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यांचे दाखले दिले. दिल्लीतील ‘निर्भया’ प्रकरणानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (एबी) तरतुदीत झालेल्या बदलांचा आधार घेत आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी ॲ्रड. कावेडिया यांनी केली. बचाव पक्षाकडून ॲड.यशपाल पुरोहित यांनी काम पाहिले.

हेही वाचा : मुंबई, पुणे, नागपुरात सर्वाधिक अपघात…

अखेर न्याय मिळाला

एकुलती एक मुलगी होती. तिच्यावर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्याच्या आईला आणखी कठोर शिक्षा व्हायला हवी होती. अखेर आम्हाला न्याय मिळाला, असे बालिकेच्या वडिलांनी सांगितले.