पुणे : नाशिकहुन मुंबईला हवालाची पाच कोटी रुपयांची रक्कम घेऊन निघालेली मोटार भिवंडीजवळ अडवून ४५ लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले. हवाला व्यहारातील रोकड लुटणारे पोलीस कर्मचारी गणेश बाळासाहेब शिंदे (वय ३५, रा. वानेवाडी, बारामती), गणेश मारुती कांबळे (वय ३४, रा. डाळींब, ता. दौंड), दिलीप मारोती पिलाने (वय ३२, रा. महमंदवाडी) यांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी हवाल व्यवहार करणारा दलाल बाबूभाई राजाराम सोलंकी (वय ४७, रा. बालाजीनगर, पुणे-सातारा रस्ता ) यालाही अटक करण्यात आली होती. याबाबत एका व्यापाऱ्याने भिवंडीजवळील नारपोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. नाशिक -मुंबई महामार्गावर भिवंडी परिसरात दिवे गावातील इंडियन ऑयल पेट्रोल पंपासमोर ८ मार्च २०२३ रोजी ही घडली. या व्यापाऱ्याचा पोलाद विक्री व्यवसाय असून, सोलंकी त्यांचा नातेवाईक आहे.
धक्कादायक! भिवंडीतील हवाला व्यवहारातील पैशांची लूट; दत्तवाडी ठाण्यातील तीन पोलीस बडतर्फ
दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले.
Written by लोकसत्ता टीम
पुणे
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 17-02-2024 at 17:12 IST
TOPICSक्राईम न्यूजCrime NewsपुणेPuneपुणे न्यूजPune NewsपोलीसPoliceफसवणूकFraudमराठी बातम्याMarathi News
+ 2 More
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune bhiwandi hawala scandal money looted three police terminated at dattawadi police station pune print news rbk 25 css