scorecardresearch

Premium

पुणे : रिक्षाप्रवासी महिलेच्या पिशवीतून रोकड चोरली, सेनापती बापट रस्त्यावरील घटना

दोन तृतीयपंथीय रिक्षाजवळ आले. त्यांनी महिलेकडे पैशांची मागणी केली. महिलेने त्यांना दहा रुपये दिले. त्यानंतर दोघांनी महिलेकडे एक रुपया मागितला.

cash stolen by transgenders in pune, woman travelling in auto rickshaw
पुणे : रिक्षाप्रवासी महिलेच्या पिशवीतून रोकड चोरली, सेनापती बापट रस्त्यावरील घटना (संग्रहित छायाचित्र)

पुणे : सिग्नलला चौकात थांबलेल्या रिक्षाप्रवासी महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी अडीच हजार रुपयांची रोकड चोरुन नेल्याची घटना सेनापती बापट रस्त्यावर घडली. या प्रकरणी दोन तृतीयपंथीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका ज्येष्ठ महिलेने याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला माॅडेल काॅलनीत राहायला आहेत. तक्रारदार महिला आणि नातेवाईक महिला रिक्षातून सेनापती बापट रस्त्याने निघाल्या होत्या.

हेही वाचा : “काही जण शिळ्या कढीला ऊत आणत असून…”, टोल मुद्द्यावरुन अंधारेंचा मनसेला टोला

Panvel, Old Woman, Gold Chain, snatched, Thieves, crime,
पनवेलमध्ये सोनसाखळी चोरट्यांनी वृद्धेला लुटले
sarwan singh pandher
‘आम्ही पाकिस्तानमधून नाही आलो’, पोलीस दलाच्या कारवाईनंतर शेतकरी नेत्याचे विधान
loksatta satire article on ashok chavan name in adarsh scam join bjp
उलटा चष्मा : अपघातानंतरचा ‘आ’!
mumbai municipal corporation pushkar jog, pushkar jog maratha survey
अभिनेता पुष्कर जोगच्या ‘त्या’ वक्तव्यावरून पालिका कर्मचाऱ्यांमध्ये संताप, संघटनांकडून कारवाईची मागणी

सेनापती बापट रस्त्यावरील वेताळबाबा चौकात रिक्षा सिग्नलला थांबली होती. त्यावेळी दोन तृतीयपंथीय रिक्षाजवळ आले. त्यांनी महिलेकडे पैशांची मागणी केली. महिलेने त्यांना दहा रुपये दिले. त्यानंतर दोघांनी महिलेकडे एक रुपया मागितला. महिलेने पिशवी उघडली. तेव्हा चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतील अडीच हजार रुपयांची रोकड हिसकावून नेली. महिलेने आरडाओरडा केला. तृतीयपंथीय पसार झाले. सहायक पोलीस निरीक्षक रुपेश चाळके तपास करत आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In pune cash stolen by transgenders from woman travelling in auto rickshaw senapati bapat road pune print news rbk 25 css

First published on: 08-10-2023 at 20:08 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×