पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या औचित्याने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत समता पंधरवड्याअंतर्गत २०२३-२४मध्ये बारावी विज्ञान आणि पदवी अभ्यासक्रम प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

एमएचटीसीईटी, नीट, जेईई, एमबीए, पी.एचडी, बीएस्सी अॅग्री, बी-फार्म, बीएस्सी नर्सिंग असे व्यावसायिक अभ्यासक्रम, अभियांत्रिकी थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यास उत्सुक विद्यार्थांना जात प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक असते. मागासवर्गीय विद्यार्थांना सांविधानिक आरक्षणातून लाभ मिळत असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी बार्टी च्या https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तात्काळ ऑनलाईन अर्ज भरून त्याची प्रत पुण्यातील येरवडा येथील जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयात प्रत्यक्ष जमा करावी लागणार आहे. अर्जासोबत अर्जदाराचे जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला, महाविद्यालयाचे शिफारस पत्र, शपथपत्र अशा पुराव्याच्या साक्षांकित प्रती जोडून जात पडताळणीचा परिपूर्ण अर्ज वेळेत सादर करावा. अर्ज वेळेत सादर न केल्यास विद्यार्थी शैक्षणिक प्रवेशासाठी वंचित राहण्याची शक्यता आहे.

Chef Vishnu Manohar Prepares 10000 Kg Misal To Mark Mahatma Phule Jayanti
शेफ विष्णू मनोहर यांनी बनवली १० हजार किलोंची मिसळ; अजित पवार अन् चंद्रकांत पाटलांनीही मारला ताव, पाहा Video
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
Bengaluru man’s post on BMTC bus conductor
बस कंडक्टरने दिले नाही ५ रुपये, प्रवाशाने अशी घडवली अद्दल! तिकिटाचा फोटो होतोय व्हायरल

हेही वाचा : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या तरुणाचा मोटारीखाली चिरडून खून; महिलेसह दोघांना अटक

जात वैधता प्रमाणपत्रासाठी यापूर्वी अर्ज सादर केलेल्या व त्रुटी अभावी अर्ज प्रलंबित असलेल्यांना समितीने मोबाइल, ई-मेलद्वारे संदेश पाठवले आहेत. संबंधित अर्जदारांनी देण्यात आलेल्या सूचनेनुसार आवश्यक कागदपत्रांसह त्रुटी पूर्तता करण्यासाठी प्रत्यक्ष जिल्हा जात पडताळणी कार्यालयात उपस्थित रहावे. महाविद्यालये, विद्यार्थी व पालकांनी जात पडताळणी प्रस्ताव कार्यालयाकडे जमा करावेत, असे आवाहन आवाहन करण्यात आले आहे.