पुणे : आपत्कालीन परिस्थितीत त्वरीत पोलीस मदत उपलब्ध व्हावी, या विचाराने राज्यात ‘११२’ टोल फ्री दूरध्वनी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या पोलीस आयुक्तालयातील पोलीस नियंत्रण कक्षाचे उद्घाटन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॅा. जालिंदर सुपेकर, रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, भाग्यश्री नवटके, आर. राजा, सहायक आयुक्त पौर्णिमा तावरे, संजय खांडे, गजानन टोम्पे, एस. एम. भालचिम आदी यावेळी उपस्थित होते. या प्रकल्पाअंतर्गत नागरिकांना त्वरीत पोलीस मदत उपलब्ध होण्यासाठी पोलीस दलातील १५७ गाड्यांवर एमडीटी यंत्रणा बसविण्यात आली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील नियंत्रण कक्षाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी त्वरीत पोलीस मदत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inauguration of police control room under 112 helpline project zws
First published on: 27-06-2022 at 22:11 IST